Join us

मुंबईत काेराेनाचा दैनंदिन मृत्यू एकेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या तीव्र संसर्गानंतर वर्ष अखेरीस पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या ६ वर आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या तीव्र संसर्गानंतर वर्ष अखेरीस पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या ६ वर आली. शिवाय, रुग्ण दुपटीचा कालावधीही ३६५ दिवसांवर पोहोचला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे.

मुंबईत आतापर्यंत २ लाख ७१ हजार ८७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ८ हजार १६८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी दिवसभरात ४८६ रुग्ण आणि ६ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख ९२ हजार ८ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ९४ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या २९० असून २ हजार ५६१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार ५८७ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.