राज्यात काेराेनाचा कहर कायम; दिवसभरात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:03+5:302021-04-14T04:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सोमवारी ६०,२१२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २८१ काेरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

Kareena's havoc in the state persists; More than 60,000 new patients every day | राज्यात काेराेनाचा कहर कायम; दिवसभरात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

राज्यात काेराेनाचा कहर कायम; दिवसभरात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी ६०,२१२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २८१ काेरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या ३५,१९,२०८ झाली असून, मृतांचा आकडा ५८ हजार ५२६ झाला आहे. सध्या राज्यात ५,९३,०४२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

दिवसभरात ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २८,६६,०९७ बाधितांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४४ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.६६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२५,६०,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२,९४,३९८ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर ३०,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.

सोमवारी नाेंद झालेल्या २८१ मृत्यूंपैकी १७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

Web Title: Kareena's havoc in the state persists; More than 60,000 new patients every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.