अंधेरी ठरली काेराेनाचा हाॅटस्पाॅट, ...यामुळेच होतेय रुग्णवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:36 AM2021-05-15T11:36:22+5:302021-05-15T11:36:42+5:30

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, वडाळा येथे संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने पालिकेचे काम प्राधान्याने येथेच सुरू राहिले.

Kareena's hotspot turned dark | अंधेरी ठरली काेराेनाचा हाॅटस्पाॅट, ...यामुळेच होतेय रुग्णवाढ

अंधेरी ठरली काेराेनाचा हाॅटस्पाॅट, ...यामुळेच होतेय रुग्णवाढ

Next

मुंबई : काेरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागला आहे. बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र जोगेश्वरी, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. एप्रिल २०२० ते १३ मेपर्यंत येथे एकूण ९२,१९५ बाधितांची नोंद झाली. तर अंधेरी पूर्व येथे सर्वाधिक १,०२७ आणि अंधेरी पश्चिमेत त ७६५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या येथे ६,११९ सक्रिय रुग्ण आहेत.

   मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, वडाळा येथे संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने पालिकेचे काम प्राधान्याने येथेच सुरू राहिले. या काळात संसर्ग पश्चिम उपनगरात वाढू लागला. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश कर्मचारी के. पूर्वेत राहत असल्याने रुग्णसंख्या वाढत गेली. दुसऱ्या लाटेतही याच विभागात रुग्णसंख्या अधिक दिसून येत
 आहे.

...यामुळेच अंधेरीत रुग्णवाढ
जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या परिसराची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख आहे. आतापर्यंत येथे सर्वाधिक ४२,७०७ बाधित आढळले. ३ जूनपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यावर के पूर्वमध्ये व्यावसायिक, औद्योगिक वसाहती, विमानतळ, मोठे हॉटेल्स, एमआयडीसीतील  व्यवहारही सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला. सध्या या विभागात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १७५ ते १७८ दिवसांचा आहे.
 

Web Title: Kareena's hotspot turned dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.