बोरीवलीत साजरा होणार कारगिल महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:11+5:302021-07-26T04:06:11+5:30
मुंबई : कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून आज (सोमवार) बोरीवली येथे भाजप आणि विविध संस्थांच्या सहकार्याने कारगिल विजय ...
मुंबई : कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून आज (सोमवार) बोरीवली येथे भाजप आणि विविध संस्थांच्या सहकार्याने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. 'कारगिल विजयाचे शिल्पकार - शिलेदारांचा सन्मान' करण्याच्या निमित्ताने जनजागृती केंद्र व ओमप्रकाश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री हरिकृष्ण चॕॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने हवालदार दिगेंद्र कुमार (महावीर चक्र), सुभेदार संतोष राळे (कीर्तिचक्र), हवालदार मधुसूधन सुर्वे (शौर्यचक्र) व नायक दीपचंद (कारगिलयोद्धा) यांचा सन्माननीय अतिथी म्हणून यथोचित सन्मान करण्यात येणार असून या प्रसंगी त्यांचे कारगिल युद्धातील थरारक अनुभव कथन करणार आहेत.
याप्रसंगी वीरमाता ज्योती राणे, मेजर नंदकुमार चौधरी, प्राचार्य सुहासिनी संत, शैला मुळे, प्राचार्य निरजा शरण, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट संजय नेवे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समस्त देशप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ओमप्रकाश प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पुजारी यांनी केले आहे. कोरोना नियमांचे पालन करूनच हा कार्यक्रम होणार असल्याचे पुजारी यांनी स्पष्ट केले आहे.