Join us  

प्रगती महाविद्यालयाने साजरा केला कारगिल विजय दिन

By admin | Published: July 28, 2014 12:18 AM

प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेने प्रगती महाविद्यालयात शनिवारी कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सोशल मीडिया जनजागृती अभियान आणि कारगिल दिवस साजरा केला

डोंबिवली : प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेने प्रगती महाविद्यालयात शनिवारी कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सोशल मीडिया जनजागृती अभियान आणि कारगिल दिवस साजरा केला. यानिमित्ताने मान्यवरांनी त्यांच्या मनोगतात, प्रत्येकाने समाजासाठी, आपल्या बांधवांसाठी आपापल्या परीने मदत केली पाहिजे. स्वतंत्र भारताचा नागरिक या नात्याने सर्वच क्षेत्रांत आपला हातभार लावला पाहिजे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर सध्याच्या कलियुगात प्रगत तंत्रज्ञानाने होणारी अधोगती रोखण्यासाठी एकत्र येऊन विविध प्रकारच्या सोशल मीडियामुळे होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या आजूबाजूला, मित्रमैत्रिणींमध्ये, समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे, असे विचार मांडले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला, तर सैन्य दलात भरती होण्याची मानसिकताही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. महाजन, प्राध्यापिका अनुजा बापट, कीर्ती गोहेल, धनंजय वानखेडे तसेच माजी विद्यार्थी विश्वनाथ बिवलकर, राहुल नाले, अमोल गांगुर्डे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)