Join us

Kargil Vijay Diwas : 48 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून त्या जवानाने फडकवला होता तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 2:37 PM

कारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. या युद्धात भारताकडून अजेक जवानांनी पराक्रमांची शर्थ केली.

नवी दिल्ली -  कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला गुरुवारी 19 वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. जम्मू-काश्मीरमधील कारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. या युद्धात भारताकडून अजेक जवानांनी पराक्रमांची शर्थ केली. त्यांच्यापैकी एक म्हणजे निवृत्त जवान दिगेंद्र सिंह. राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी असलेल्या दिगेंद्र सिंह यांनी कारगिलच्या युद्धाता पाकिस्तानशी लढताना अतुल्य पराक्रम गाजवला होता. युद्धादरम्यान दिगेंद्र सिंह यांना पाच गोळ्या लागल्या. अशा परिस्थितीतही जिद्दीने लढा देत त्यांनी पाकिस्तानचे 48 जवान आणि घुसखोरांना ठार मारले होते. दरम्यान, आजही युद्धाची घोषणा झाल्यास आपण आपल्या बटालियनसोबत युद्ध लढण्यास जाऊ. जर बटालियन आणि सराकारने लढण्याची परवानगी दिली नाही , तर त्यांना समजावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे दिगेंद्र सिंह सांगतात. दिगेंद्र सिंह हे लष्कराती सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या 2 राजपुताना रायफल्सकडून लढले होते.  कारगिल युद्धादरम्यान दिगेंद्र सिंह यांनी पाकिस्तानचा मेजर अन्वयाचे शीर धडापासून वेगळे करून त्यावर तिरंगा फडकवला होता. दिगेंद्र म्हणतात, माझ्याकडे युद्धाचा अनुभव आहे. लढण्याची संधी मिळाली नाही तरी सहकारी जवांनांची काही तरी मदत नक्कीच करू शकतो. दरम्यान, कारगिल युद्धाच्या समाप्तीनंतर दिगेंद्र सिंह यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्याहस्ते महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. दिगेंद्र सिंह हे 2005 साली लष्करातून निवृत्त झाले होते.  

टॅग्स :भारतीय जवानकारगिल विजय दिनभारतपाकिस्तान