Join us  

Kargil Vijay Diwas : खेदजनक... कारगिल युद्ध लढलेल्या जवानाला शाळेबाहेर विकावा लागतोय ज्यूस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 1:00 PM

12 जून 1999 सालचा तो दिवस मी कदापी विसरु शकत नाही. रात्री 11 वाजता 15 हजार फूट उंचीवर पाकिस्तानी सैन्याशी सतबीर यांचा सामना झाला होता. पाक पाकिस्तानी सैनिकांसोबतच काही घुसखोरही होते,

मुंबई - कारगिल युद्धातील वीर जवानांच्या कार्याला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांना आज देशभरात आंदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य नागरिकांकडून जवानांच्या कार्याला सलाम करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कारगिल युद्धात दोन गोळ्या अंगावर झेलून पाकिस्तानी सैन्याला पळवून लावणाऱ्या लांस नायक सतबीर यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत हालाकीत दिवस काढण्याची वेळ सतबीर यांच्यावर आली आहे. 

पाकिस्तानी सैन्याशी दहा-दहा तास लढा देताना भारतभूमीचे रक्षण हेच अंतिम ध्येय मानून लढणाऱ्या जवानावर आज ज्यूस विकायची वेळ आली आहे. कागरिल युद्धात सतबीर (52 वर्षे) यांना दोन गोळ्या लागल्या, तरीही त्यांनी पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर दिले. जीवन-मृत्यूच्या या संघर्षात त्यांनी चार पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला. कारगिल युद्धातील या आठवणी सांगताना आजही सतबीर यांच्या अंगावर शहारे येतात, चेहरा लालबूंद होतो तर कपाळावर एक रेषा उभारताना दिसते. मात्र, या बहादूर जवानावर आज उदरनिर्वाहासाठी मुखमेलपूर येथील एका प्राथमिक शाळेबाहेर ज्यूसचा गाडा चालविण्याची वेळ आली आहे. सरकारच्या दुर्लक्षतेमुळेच सीमारेषेवर कधीही न थकणारा भारतमातेचा हा पुत्र आपल्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडताना थकलेला दिसतो. पत्नी राजेश देवी आणि मुले कृष्ण व कपिल राणा यांच्या उदर्निर्वाहासाठी हालाकित जगतोय. सतबीर आज आपल्या हक्क आणि अधिकारासाठी अलीपूर येथील शहीद स्मारकाजवळ एक दिवसाचा उपवासही करत आहे.

टोपी घातलेला, एका हातात काठी घेतलेला सतबीर ग्राहकांना ज्यूस देताना दिसतो. मात्र, कारगिल युद्धाचा विषय निघताच 19 वर्षांपूर्वीचा जवान आजही त्यांच्या रोमरोमात जिवंत झाल्याचे दिसते. 12 जून 1999 सालचा तो दिवस मी कदापी विसरु शकत नाही. रात्री 11 वाजता 15 हजार फूट उंचीवर पाकिस्तानी सैन्याशी सतबीर यांचा सामना झाला होता. पाक पाकिस्तानी सैनिकांसोबतच काही घुसखोरही होते, जे सतबीर यांच्यापेक्षाही उंचीवर होते. त्यावेळी सतबीर यांच्या कंपनीचे कमांडर मेजर विवेक गुप्ता थे. या दलात एकूण नऊ सैनिक होते. ज्यामध्ये सतबीर सर्वात पुढे होते. डोंगरावर चढत असताना अचानक दुश्मनांनी त्यांच्यावर ग्रेनेडहल्ला केला. पण, हँड ग्रेनेड फुटण्यापूर्वीच सतबीर यांनी आपल्या रायफलमधून 30 गोळ्यांची फायरींग शत्रूंवर केली. जवळपास दीड वर्षे शत्रुने याजागेवर ताबा मिळवला होता. तर उंचीवर असल्यामुळे भारतीय सैन्याची प्रत्येक हालचाल त्यांना माहित होत होती. 12 जूनच्या त्या रात्री सतबीर यांनी आपल्या सैनिकांसमवेत पाकिस्तानी शत्रुला चकवा दिला. आपल्या रायफलमधून गोळ्यांचा वर्षा करत घुसखोरांना यमसदनी पाठवले. तर शेवटी जिवंत राहिलेल्या दोघांपैकी एकास सतबीरने ठार केले. या ऑपरेशनमध्ये कंपनी कमांडर विवेक गुप्तांसह सहा जवानां वीरमरण आले होते. तर सतबीर यांच्याही उजव्या पायालो दोन गोळ्या लागल्या होत्या. तरीही ते शुत्रू राष्टातील सैन्यावर तुटून पडत होते. पहाटेच्या 5 वाजेपर्यंत त्यांनी मृत्यूशी झूंज देत लढा सुरुच ठेवला आणि अखेर पहाटेचा सूर्योदय होण्यापूर्वीच साडेचार हजार फूट उंचीवर तिरंगा फडकवला. त्यावेळीही सतबीर यांच्या पायातून रक्त वाहतचं होते. अखेर, भारतीय सैन्याची दुसरी तुकडी पोहोचल्यानंतर सतबीर यांना द्रास सेक्टर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन सतबीर यांचा जीव वाचवला. भारतमातेसाठी लढताना मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या या जवानाची कहाणी आणि आजची परिस्थीती पाहिल्यास नक्कीच डोळ्यांच्या कडा पाणावतील.  

टॅग्स :कारगिल विजय दिनशहीद