मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी करमळी-नागपूर विशेष फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:58 PM2020-01-06T23:58:32+5:302020-01-06T23:58:39+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी १० जानेवारीपासून एलटीटी-करमळी, सीएसएमटी-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फे-या सोडण्यात येणार आहेत.

Karmali-Nagpur special rounds for passengers by Central Railway | मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी करमळी-नागपूर विशेष फेऱ्या

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी करमळी-नागपूर विशेष फेऱ्या

googlenewsNext

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी १० जानेवारीपासून एलटीटी-करमळी, सीएसएमटी-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या फे-या सोडण्यात येणार आहेत. एक्स्प्रेसमधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
एलटीटी ते करमळी एक्स्प्रेस १० जानेवारी रोजी रात्री ८.४५ वाजता सुटेल. ही गाडी करमळी येथे दुसºया दिवशी सकाळी ८.३० ला पोहोचेल. तर १२ जानेवारी रोजी करमळीहून दुपारी १ वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस एलटीटीला दुसºया दिवशी रात्री १२ वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसलाा ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम स्थानकात थांबा दिला जाईल.
सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस ५ जानेवारी रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकात थांबा दिला जाईल.
करमळी-पनवेल एक्स्प्रेस ११ जानेवारी रोजी करमळीहून दुपारी १ वाजता सुटेल. ही गाडी पनवेल येथे रात्री ११.१५ वाजता पोहोचेल. पनवेल-करमळी एक्स्प्रेस १२ जानेवारी रोजी पनवेलहून रात्री १२.५५ वाजता सुटेल. ही गाडी करमळी येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम स्थानकात थांबा दिलेला आहे.

Web Title: Karmali-Nagpur special rounds for passengers by Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.