कर्मयोगी मोतीराम भावे जीवनचरित्र प्रकाशन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:10+5:302021-02-16T04:07:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, राष्ट्र सेवा दल आणि स्वराज सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Karmayogi Motiram Bhave Biography Publication Ceremony | कर्मयोगी मोतीराम भावे जीवनचरित्र प्रकाशन सोहळा

कर्मयोगी मोतीराम भावे जीवनचरित्र प्रकाशन सोहळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, राष्ट्र सेवा दल आणि स्वराज सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ मच्छीमार नेते, वेसाव्याचे माजी नगरसेवक स्वर्गीय मोतीराम भावे यांचे पुस्तकरूपी जीवन चरित्र ‘कर्मयोगी मोतीराम भावे’ प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर (स्व.दत्ताराम कास्कर उद्याना समोर) पंचमार्ग, यारी रोड, वर्सोवा येथे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा सोहळा संपन्न होईल.

यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास, वस्त्रोद्योग व पालकमंत्री (मुंबई शहर) अस्लम शेख, परिवहन, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर, भारतीय संग्राम परिषदचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे, वर्सोव्याच्या स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार भाई जगताप, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार रमेश पाटील, आमदार कपिल पाटील आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

--------------------------------------

Web Title: Karmayogi Motiram Bhave Biography Publication Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.