Join us

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र, सुरक्षेतेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 8:20 AM

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. 

मुंबई : मुंबईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या काँग्रेस आणि जनता दलाच्या(एस) बंडखोर आमदारांनी सुरक्षेच्या मागणीसाठी पोलिसांनी पत्र लिहिले आहे. 

मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांच्या पत्राची दखल घेत मुंबई पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढविली आहे. रेनेसन्स हॉटेल बाहेर पोलीस तैनात करण्यात आले असून हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ  येणा-जाणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. 

जनता दलाचे (एस) बंडखोर आमदार नारायण गौडा यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि डीके शिवकुमार मंगळवारी आमदारांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत. यामुळे आम्ही सर्व आमदारांनी मिळून पोलिसांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आम्ही सुरक्षा मागितली आहे. कारण, एचडी कुमारस्वामी आणि डीके शिवकुमार आम्हाला भेटण्यासाठी सक्ती करु शकणार नाहीत.' दुसरीकडे, डीके शिवकुमार मुंबईत दाखल झाले असून त्यांनी बंडखोर आमदारांशी चर्चा करण्यास असल्याचे सांगितले आहे. मात्र, डीके शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव केल्याचे समजते. 

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकला 'असा' डाव, बंडखोर आमदारांसमोर निर्माण झाला पेचकर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. विधानसभेतील कुठलाही बंडखोर आमदार मला भेटलेला नाही. तसेच 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांचे राजीनामे हे नियमांच्या चौकटीत बसणारे नसल्याचे त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच मी या आमदारांना भेटण्यासाठी वेळही दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे. तसेच आमदारांच्या राजीनाम्याबाबतही संशय निर्माण झाला आहे. 'मी संविधानाचे पालन करेन. तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीशी माझा काहीही संबंध नाही. मी संविधानानुसार काम करत राहीन. आतापर्यंत तरी कुठल्याही आमदाराने माझ्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितलेला नाही. जर कुणी मला भेटू इच्छित असेल तर मी माझ्या कार्यालयात उपस्थित असेन. मला जबाबदारीने निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी नियमांनुसार कुठलीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही,'' असे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सांगितले.  

टॅग्स :कर्नाटक राजकारणकर्नाटकमुंबईकुमारस्वामी