Karnataka Elections results 2018 live: भाजपाच्या मुसंडीनंतर शेअर बाजारात उसळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 10:12 AM2018-05-15T10:12:09+5:302018-05-15T10:51:50+5:30
हेच कल कायम राहिल्यास भाजपा कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल.
मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर शेअर बाजारात मोठी उसळी घेतल्याचे चित्र आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीचा काही काळ काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या दोन्ही पक्षांना बरेच पाठी टाकले. हे कल हाती आल्यानंतर सेन्सेक्स तब्बल 200 अंकांनी वधारला. तर निफ्टी 10850 च्या पातळीवर जाऊन पोहोचला.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी ७२ टक्के मतदान झाले होते. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपा 106, काँग्रेस 75, जनता दल (सेक्युलर) 38 जागांवर आघाडीवर आहे. हेच कल कायम राहिल्यास भाजपा कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल. परिणामी त्रिशंकू निकालांमुळे अस्थिरता निर्माण होणार नाही.
Official EC trends: BJP leading on 85 seats, Congress on 47, JD(S) ahead on 35 seats, Others 02. #KarnatakaElections
— ANI (@ANI) May 15, 2018
Correct position will be known at 11-11.30 am. I am going to discuss it( possibility of alliance with JDS) with Ghulam Nabi Azad and Ashok Gehlot.: Mallikarjun Kharge,Congress #KarnatakaElections2018pic.twitter.com/vvUqunzVA6
— ANI (@ANI) May 15, 2018