कर्नाटक सरकारचा निषेध; शिवरायांचा पुतळा हटवल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 01:41 AM2020-08-10T01:41:35+5:302020-08-10T01:41:53+5:30

बोरीवली, वर्सोवा, जोगेश्वरी या विविध ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Karnataka government's protest; Anger over removal of Shivratri statue | कर्नाटक सरकारचा निषेध; शिवरायांचा पुतळा हटवल्याने संताप

कर्नाटक सरकारचा निषेध; शिवरायांचा पुतळा हटवल्याने संताप

Next

मुंबई: कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याच्या निषेधार्थ पश्चिम उपनगरात शिवसेनेकडून त्याचे तीव्र पडसाद उमटले.

बोरीवली, वर्सोवा, जोगेश्वरी या विविध ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडरिअप्पा यांना जोडेमारा आंदोलन करण्यात आले.

शिवसेना विभाग क्र. १ च्यावतीने बोरीवली पूर्व ओंमकारेश्वर मंदिर, नॅशनल पार्कसमोरील पश्चिम द्रुतगती महामार्गावर कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या केलेल्या अवमानाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी कर्नाटक सरकार विरोधात घोषणा देऊन मुख्यमंत्री येडरिअप्पा यांना जोडेमारा आंदोलन करण्यात आले.

शिवसेना वर्सोवा विधानसभा शाखा क्र ५९-६०च्या वतीने ‘सात बंगला, वटेश्वर मंदिरासमोर कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ’ घोषणा देऊन शिवप्रेमींचा कर्नाटक सरकारवरील राग व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातील भाजपचे पदाधिकारी आज मात्र याप्रकरणी चिडीचूप आहेत, याचाही निषेध करण्यात आला.
जोगेश्वरी पश्चिम आनंदनगर सिग्नलवर शिवसेना प्रभाग क्रमांक ६२चे नगरसेवक व उपविभागप्रमुख राजू पेडणेकर यांनी कर्नाटक सरकार विरोधात धरणे आयोजित करून जोरदार घोषणा देण्यात आल्या.

भाजप गप्प असल्याचाही आंदोलनात निषेध
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बेळगाव प्रशासनाने रातोरात हटवले. भाजप कर्नाटक सरकारने केलेल्या या दुष्कृत्याच्या निषेधार्थ शिवसेना मध्यवर्ती शाखा गोरेगाव येथे आंदोलन करण्यात आले.
शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारवरील राग व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातील भाजपचे पदाधिकारी आज मात्र याप्रकरणी चिडीचूप आहेत, याचाही निषेध करण्यात आला.

Web Title: Karnataka government's protest; Anger over removal of Shivratri statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.