बंडखोरांची मनधरणीसाठी आलेले काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 03:11 PM2019-07-10T15:11:39+5:302019-07-10T15:12:16+5:30
डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई : कर्नाटकातील सत्ता संघर्षाला नवीन वळण आले असून मुंबईतील पवईमध्ये असलेल्या रेनेसन्स हॉटेलबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. काँग्रेस-जनता दलाचे (एस)बंडखोर आमदार रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार या ठिकाणी आले आहे. त्यांना हॉटेलमध्ये पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे याठिकाणी तवाणाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बंडखोर आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार आज सकाळी मुंबईत दाखल झाले असून त्यांना भेटण्यास या आमदारांनी नकार दिला आहे. तसेच, या आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा मागविली आहे. त्यामुळे पोलिसांकडून डीके शिवकुमार यांना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. तरीही सकाळपासून बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, हॉटेल परिसरात संचारबंदी लागू केली आहे.
Karnataka Minister DK Shivakumar and other Congress leaders who were detained, are being taken to Kalina University rest house https://t.co/ySG80RSIoy
— ANI (@ANI) July 10, 2019
मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.
Karnataka Minister DK Shivakumar who after being denied entry, was sitting outside Renaissance - Mumbai Convention Centre Hotel, detained by Mumbai Police.Section 144 had been imposed in the area. pic.twitter.com/dpHAObKkID
— ANI (@ANI) July 10, 2019
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.