कशाळकर, मुळ्ये यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार; सांस्कृतिक कार्य विभागाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 08:40 AM2023-11-12T08:40:28+5:302023-11-12T08:40:49+5:30
मुंबई : अन्य पुरस्कारांमध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०२२ : पं. उल्हास कशाळकर, वर्ष २०२३ ...
मुंबई : अन्य पुरस्कारांमध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०२२ : पं. उल्हास कशाळकर, वर्ष २०२३ साठी पुरस्कार : पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०२२ : सुहासिनी देशपांडे, २०२३ साठी : अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२२ : नयना आपटे, २०२३ साठी : पं. मकरंद कुंडले, नाटक या विभागासाठी २०२२ : वंदना गुप्ते, २०२३ : ज्योती सुभाष, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये २०२२ ; मोरेश्वर निस्ताने, २०२३ : ऋषिकेश बोडस, कंठ संगीत प्रकार २०२२ : अपर्णा मयेकर, २०२३ : रघुनंदन पणशीकर, लोककलेसाठी २०२२ : हिरालाल रामचंद्र सहारे, २०२३ साठी पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहिरी क्षेत्रातील २०२२ : जयंत अभंगा रणदिवे, २०२३ : राजू राऊत, नृत्य वर्गवारीत २०२२ : लता सुरेंद्र, २०२३ : सदानंद राणे, चित्रपट क्षेत्रासाठी २०२२ : चेतन दळवी, २०२३ : पुरस्कार निशिगंधा वाड, कीर्तन प्रबोधन क्षेत्र २०२२ : संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी, २०२३ : अमृत महाराज, वाद्य संगीत : २०२२ पं. अनंत केमकर, २०२३ : शशिकांत सुरेश भोसले, कलादान प्रकारासाठी २०२२ : संगीता राजेंद्र टेकाडे, २०२३ : यशवंत रघुनाथ तेंडोलकर.
तमाशा वर्गवारीत राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२२ : बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर), २०२३ : उमा खुडे, आदिवासी गिरिजन वर्गवारीत २०२२साठी भिकल्या धाकल्या धिंडा, २०२३ साठी सुरेश नाना रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.