कौन बनेगा महापौर?

By admin | Published: June 25, 2015 11:30 PM2015-06-25T23:30:02+5:302015-06-25T23:30:02+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. यंदा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या दोन

Kaun Banega Mayor? | कौन बनेगा महापौर?

कौन बनेगा महापौर?

Next

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. यंदा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या दोन आकडीदेखील नसल्याने ही निवडणूक लढविण्याच्या फंदात विरोधी पक्ष पडणार नाही, असा अंदाज आहे. बहुजन विकास आघाडीतर्फे महापौरपदासाठी प्रवीणा ठाकूर तर उपमहापौरपदासाठी उमेश नाईक व नितीन राऊत या दोघांची नावे चर्चेत आहेत.
२००९ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिली अडीच वर्षे राजीव पाटील यांना महापौरपद देण्यात आले. त्यानंतरची अडीच वर्षे नारायण मानकर यांनी हे पद भूषविले. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ जागांपैकी १०६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्यामुळे ही दोन्ही पदे बहुजन विकास आघाडीकडेच जाणार आहेत. आवश्यक ते संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षातर्फे या दोन्ही निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर होण्याची शक्यता नाही. महापौरपदी संधी देण्यात येणाऱ्या प्रवीणा ठाकूर या गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषकरू न बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी ‘सेवा’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला.
उपमहापौरपदासाठी चर्चेत असलेले उमेश नाईक हे तत्कालीन नालासोपारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते, तर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शेवटची दोन वर्षे त्यांना सभागृह नेतेपद बहाल करण्यात आले होते. चर्चेत असलेले तिसरे नाव नितीन राऊत हे तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते, तर गेली ५ वर्षे महानगरपालिकेच्या ई प्रभाग समितीचे सभापती होते. नितीन राऊत हे आ. हितेंद्र ठाकूर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. (प्रतिनिधी)

Web Title: Kaun Banega Mayor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.