केडीएमसीचे शिलकी अंदाजपत्रक सादर

By admin | Published: February 10, 2015 12:35 AM2015-02-10T00:35:37+5:302015-02-10T00:35:37+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे २०१५-१६ चे १२९२ कोटी रुपये जमेचे आणि १२९१ कोटी ९० लाख रुपये खर्चाचे, १० लाख ३५ हजार रुपये

KDMC Balance Budget presentation | केडीएमसीचे शिलकी अंदाजपत्रक सादर

केडीएमसीचे शिलकी अंदाजपत्रक सादर

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे २०१५-१६ चे १२९२ कोटी रुपये जमेचे आणि १२९१ कोटी ९० लाख रुपये खर्चाचे, १० लाख ३५ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्त मधुकर अर्दड यांनी सोमवारी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांना सादर केले.
उत्पन्नाला मर्यादा, परिणामी विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण देत सद्य:स्थितीत सुरू असलेल्या विकासकामांना पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प यंदाही करण्यात आला आहे. जुन्याच मुद्यांना उजळणी देण्याचा प्रयत्न झाला असून यात कोणत्याही नव्या लोकाभिमुख योजनांचा समावेश नाही. उत्पन्नाची बाजू पाहता स्थानिक संस्था कर २२८ कोटी ७० लाख, मालमत्ता कर २६१ कोटी ९२ लाख, पाणीपट्टी ६० कोटी २० लाख, विशेष वसुलीतून ९० कोटी १ लाख, मनपा मालमत्तेतून ३३ कोटी ६७ लाख व अन्य माध्यमातून १४ कोटी २१ लाखांचे उत्पन्न २०१५-१६ या वर्षात मिळणार असल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: KDMC Balance Budget presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.