के-ईस्ट : भाजपाची सेनेवर मात

By admin | Published: February 25, 2017 03:38 AM2017-02-25T03:38:33+5:302017-02-25T03:38:33+5:30

के-ईस्ट वॉर्डमध्ये भाजपाने सेनेवर वर्चस्व गाजवले. भाजपाचे तब्बल सात उमेदवार जिंकले तर सेनेचे चार, काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी गड राखला तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.

KE-East: BJP defeats Army | के-ईस्ट : भाजपाची सेनेवर मात

के-ईस्ट : भाजपाची सेनेवर मात

Next

मुंबई : के-ईस्ट वॉर्डमध्ये भाजपाने सेनेवर वर्चस्व गाजवले. भाजपाचे तब्बल सात उमेदवार जिंकले तर सेनेचे चार, काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी गड राखला तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या वॉर्डमध्ये सेनेच्या अधिक जागा येतील, असा दावा करण्यात येत होता. प्रत्यक्षात भाजपा उमेदवारांनी अधिक जोर लावल्याने सेनेचा पराभव झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र येथे फारसा काही जोर नसल्याचे निदर्शनास आले.
प्रभाग क्रमांक ७२ मध्ये भाजपाचे पंकज यादव यांना १२ हजार ७०९ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकाचे शिवसेनेचे उमेदवार अनिल माने यांना ११ हजार ३२१ मते मिळाली. याखालोखाल काँग्रेसच्या
शिल्पा साळवी यांना ३ हजार ५७४ मिळाली.
हे तीन उमेदवार वगळून उर्वरित उमेदवारांना मात्र फारशी काही आशादायक कामगिरी करता आली नाही. प्रभाग क्रमांक ७३ मध्ये शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांना १३
हजार ८४ आणि भाजपाचे भालचंद्र अंबुरे यांना ५ हजार ५७९ मते
मिळाली.
काँग्रेसचे नितीन सावंत यांना ३ हजार २०९ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ७४ मध्ये भाजपाच्या उज्ज्वला मोडक यांना ९ हजार ७१३ मते मिळाली.
शिवसेनेच्या रचना सावंत यांना ९ हजार २५५ मते मिळाली. काँग्रेसच्या पुष्पा भोळे यांना २ हजार ४२२ तर मनसेच्या संध्या मोरे यांना २ हजार ३८५ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक ७५ मध्ये सेनेच्या प्रियंका सावंत यांनी तब्बल १० हजार ८०१ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारली. प्रभाग ७६ मध्ये भाजपाच्या केशरबेन पटेल यांनी तब्बल १२ हजारांवर मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. प्रभाग ७७ मध्ये सेनेचे अनंत नर यांनी बारा हजारांवर मते मिळवत गड जिंकला. प्रभाग ७८ मध्ये तर राष्ट्रवादीच्या सोफी नाजिया यांनी ४ हजारांवर मते प्राप्त करत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारली.
प्रभाग ७९ मध्ये सेनेचे सदानंद परब यांनीही नऊ हजारांवर मते मिळवत गड जिंकला. प्रभाग ८० मध्ये भाजपाचे सुनील यादव यांनी बारा हजारांवर मते मिळवत सेनेचे मनोहर पांचाळ यांना धूळ चारली.
प्रभाग ८१ मध्ये भाजपाचे मुरजी पटेल यांनी दहा हजारांवर मते प्राप्त करत सेनेचे संदीप नाईक यांचा पराभव केला.
प्रभाग ८२ मध्ये काँग्रेसचे जगदीश अमिन यांनी साडेपाच हजारांवर मते मिळवत भाजपाचे संतोष केळकर यांचा पराभव केला. प्रभाग ८३ मध्येही काँग्रेसच्या विन्नी डिसोजा यांनी साडेसात हजारांवर मते घेत सेनेच्या निधी सावंत यांचा पराभव केला.
प्रभाग ८४ मध्ये अभिजित सामंत तर प्रभाग ८५ मध्ये ज्योती अळवणी यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. आणि प्रभाग ८६ मध्ये काँग्रेसच्या सुषमा राय यांनी सहा हजारांहून अधिक मते घेत भाजपासह सेनेला धूळ चारली. (प्रतिनिधी)

Web Title: KE-East: BJP defeats Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.