बाळासाहेबांची हिच शिकवण अन् दिघेसाहेबांची हीच भूमिका; केदार दिघेंची ठाकरेंसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:09 PM2022-07-27T20:09:56+5:302022-07-27T20:10:02+5:30

केदार दिघे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Kedar Dighe has wished Shiv Sena chief Uddhav Thackeray on his birthday. | बाळासाहेबांची हिच शिकवण अन् दिघेसाहेबांची हीच भूमिका; केदार दिघेंची ठाकरेंसाठी खास पोस्ट

बाळासाहेबांची हिच शिकवण अन् दिघेसाहेबांची हीच भूमिका; केदार दिघेंची ठाकरेंसाठी खास पोस्ट

Next

मुंबई/ठाणे- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. गावाखेड्यातील शिवसैनिक सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहे. तर, राजकीय पक्षाचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येतात. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीसमोर झुकणार नाही, हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मराठी बाणा जपणारे, तमाम सामान्य जनतेची कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेणारे महाराष्ट्राचे लोकनायक, आदर्श राजकारणाचे मूर्तीमंत व्यक्तिमत्व उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.

आमचं हिंदुत्व हे मुखात राम आणि हाताला काम असं आहे. निवडणुकीसाठी काहीजण हिंदुत्व वापरतात, तसं आमचं हिंदुत्व नाही...आमचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. बाळासाहेबांची हिच शिकवण आहे..दिघेसाहेबांची हीच भूमिका आहे, असं केदार दिघे यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटलं असतं. मात्र आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम पाहत नाहीत, तर ते शरद पवार यांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करताहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमाई, बाळासाहेबांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाली आहे, अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी केली.

सामनाने जाहिराती नाकारल्या-

दरवर्षी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी सामनात जाहिरात देतो. परंतु यावर्षी आमच्या जाहिराती घेऊ नये असं कर्मचाऱ्यांना वरून कळवण्यात आले होते. त्यामुळे यंदा आम्ही जाहिरात देत होतो परंतु ती सामनातून नाकारण्यात आली. उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर, दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. प्रत्येक खासदाराला जाहिरात नाकारण्याचा अनुभव आला असेल अशी माहिती शिंदे गटातील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली. 

Web Title: Kedar Dighe has wished Shiv Sena chief Uddhav Thackeray on his birthday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.