‘डोळ्यांवर काकडी, बटाटा ठेवणे टाळा’

By Admin | Published: March 22, 2016 03:34 AM2016-03-22T03:34:31+5:302016-03-22T03:34:31+5:30

उकाडा सुरू झाल्यावर अनेकांना डोळ््यात जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे असे त्रास जाणवू लागतात. अशा वेळी डोळ््यांना थंडावा मिळावा, म्हणून अनेक जण घरगुती उपाय करतात.

'Keep Cucumber and Potato on the Eyes' | ‘डोळ्यांवर काकडी, बटाटा ठेवणे टाळा’

‘डोळ्यांवर काकडी, बटाटा ठेवणे टाळा’

googlenewsNext

मुंबई : उकाडा सुरू झाल्यावर अनेकांना डोळ््यात जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे असे त्रास जाणवू लागतात. अशा वेळी डोळ््यांना थंडावा मिळावा, म्हणून अनेक जण घरगुती उपाय करतात. हे उपाय डोळ््यांसाठी घातक असून, त्यामुळे दृष्टी जाऊ शकते. सोलापूरच्या एका महिलेला यामुळेच दृष्टी गमावावी लागल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सोलापूरच्या महिलेला डोळ््यांना त्रास होत होता. त्यामुळे डोळ््यांना थंडावा मिळावा, म्हणून तिने डोळ््यावर बटाट्याचे काप ठेवले आणि त्यावर थोडे पाणी टाकले होते. मात्र, पाण्यामुळे बटाट्यामधील बुरशी तिच्या डोळ््यात गेली. त्यामुळे तिचा त्रास अधिक बळावला. बुरशीचा अंश डोळ््यात गेल्यामुळे तिच्या डोळ््यात पू झाला. तिच्यावर ४ दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, बुरशीमुळे तिची दृष्टी गेल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.
डोळा अत्यंत नाजूक असतो. डोळ््यांजवळील त्वचा काळी पडली, डोळे दुखत असल्यास अनेक जण काकडी, बटाट्याचे काप डोळ््यांवर ठेवतात, हे चुकीचे आहे. हे काप डोळ््यांखालील त्वचेवर ठेवावे. काकडी किंवा बटाट्याचे निर्जंतुकीकरण केलेले नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे डोळ््याला इजा सहज होऊ शकते. त्यामुळे अंधत्व येऊ शकते, असे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Keep Cucumber and Potato on the Eyes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.