आशा जिवंत ठेवा, आम्ही पुन्हा आकाशात उंच भरारी घेऊ - प्रभू गौर गोपाल दास यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:30 AM2020-05-22T02:30:55+5:302020-05-22T06:07:01+5:30

मुंबई : कोविड-१९ लॉकडाऊनने प्रत्येकाला अनिश्चित काळात नेऊन ठेवले आहे, पण आशा जिवंत ठेवल्या आहेत. ठोस प्रयत्न आणि उपाययोजनांनी ...

 Keep the hope alive, we will soar high in the sky again - Prabhu Gaur Gopal Das's statement | आशा जिवंत ठेवा, आम्ही पुन्हा आकाशात उंच भरारी घेऊ - प्रभू गौर गोपाल दास यांचे प्रतिपादन

आशा जिवंत ठेवा, आम्ही पुन्हा आकाशात उंच भरारी घेऊ - प्रभू गौर गोपाल दास यांचे प्रतिपादन

googlenewsNext

मुंबई : कोविड-१९ लॉकडाऊनने प्रत्येकाला अनिश्चित काळात नेऊन ठेवले आहे, पण आशा जिवंत ठेवल्या आहेत. ठोस प्रयत्न आणि उपाययोजनांनी आम्ही नक्कीच पुन्हा एकदा आकाशात भरारी घेणार आहोत, असा विश्वास कृष्णा चेतना आंतरराष्ट्रीय सोसायटीचे (इस्कॉन) प्रभू गौर गोपाल दास यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
सध्या सुरू असलेल्या कोविड लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठी उपाय शोधण्यासाठी लोकमत मीडिया समूहातर्फे आयोजित वेबिनार ‘पुनश्च भरारी’ मालिकेत त्यांनी भाग घेतला. लोकमत महामॅरेथॉनच्या प्रवर्तक रुचिरा दर्डा आणि गिरिजा ओक गोडबोले यांनी आॅनलाईन कार्यक्रमात प्रभू गौर गोपाल दास यांना प्रश्न विचारले.
रुचिरा दर्डा म्हणाल्या, दोन महिन्यांपासून लोक घरातच बंदिस्त आहेत आणि याचा परिणाम जवळजवळ प्रत्येक उप्रकम, व्यापार, व्यवसाय, उद्योग आणि मानवी जीवनावर झाला आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर मानवी जीवनासाठी नवीन काय असेल हे कुणालाही माहीत नाही. गोपाल दास यांनी यावर विस्तृतपणे मार्गदर्शन करावे.

ठोस प्रयत्न करा
- गोपाल दास म्हणाले,कठीण परिस्थितीत प्रत्येकजण आपला व्यवसाय, नोकरी, पगार आणि भविष्यात त्याच्या आणि कुटुंबासाठी काय असेल याविषयी चिंता करीत होता. ही नक्कीच कठीण परिस्थिती आहे आणि केवळ आशा जिवंत ठेवणे हाच पर्याय आहे. यातून पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकेल.
याशिवाय सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य प्रयत्न करण्याची तातडीने गरज आहे.
आशा आणि सकारात्मक दृष्टिकोन जीवनाचे वास्तव बदलत नाही आणि त्याकरिता आपल्याला काही ठोस प्रयत्न जरूर केले पाहिजेत.

Web Title:  Keep the hope alive, we will soar high in the sky again - Prabhu Gaur Gopal Das's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.