स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, आजार टाळा!

By admin | Published: September 11, 2015 03:20 AM2015-09-11T03:20:44+5:302015-09-11T03:20:44+5:30

बाहेरचे अन्नपदार्थ खाल्याने, दूषित पाणी प्यायल्याने आजार पसरतात. म्हणून अनेकदा बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळले जाते. तरीही अनेकांना अन्नातून विषबाधेचा त्रास होतो.

Keep the kitchen clean, avoid the disease! | स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, आजार टाळा!

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, आजार टाळा!

Next

मुंबई : बाहेरचे अन्नपदार्थ खाल्याने, दूषित पाणी प्यायल्याने आजार पसरतात. म्हणून अनेकदा बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळले जाते. तरीही अनेकांना अन्नातून विषबाधेचा त्रास होतो. याचे मुख्य कारण
म्हणजे अन्नातून होणारी विषबाधा
ही स्वयंपाकघरात फिरणाऱ्या झुरळांमुळे होत असल्याचे
वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
अवघ्या काही दिवसांत घराघरांमध्ये बाप्पाचे आगमन होणार आहे. त्या वेळी अनेक नातेवाईक, मित्रमंडळी येतात. यामुळे स्वयंपाकघरातील वावर वाढतो. अनेक खाद्यपदार्थ आवर्जून केले जातात. घरात अनेक लोक असल्यामुळे अन्नपदार्थांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अन्नपदार्थ झाकायचे राहून जाते. अशावेळी स्वयंपाकघरातील झुरळांची संख्या वाढण्याची शक्यता बळावते. अन्नपदार्थ, पाणी उघडे राहिल्यास झुरळांमुळे पाणी दूषित होऊ शकते.
घरात शिजवलेल्या अन्नपदार्थांतून विषबाधेचा त्रास अथवा उलट्या, जुलाब होणे अशक्य असते असा अनेक महिलांचा गैरसमज आहे. स्वयंपाक करताना स्वच्छ भांड्यांचा वापर केला जातो. शक्यतो ताज्या फळभाज्या वापरल्या जातात. रोज स्वयंपाकाचा ओटा धुतला जातो. स्वयंपाकगृहात सर्व ठिकाणी स्वच्छता राखली जाते. कोणत्याही प्रकारचा घाणेरडापणा नसतो. जेवण करतानाही हात स्वच्छ धुतलेले असतात. अशी सर्व प्रकारची काळजी महिला घेतात. त्यामुळे घरातील अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता नसते, असा महिलांचा विश्वास असतो. पण वस्तुस्थिती तशी नाही.
प्रत्यक्षात वरीलप्रकारे स्वयंपाकघराची केलेली स्वच्छता पुरेशी नाही. वरकरणी स्वयंपाकघर स्वच्छ झाले असे वाटत असले तरीही स्वयंपाकघरात फिरणाऱ्या झुरळांमुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो. स्वयंपाकघरात काम करताना झुरळे दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना स्वयंपाकघर स्वच्छ असल्याचे वाटते. पण, रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात कोणीही नसताना, झुरळे स्वयंपाकघरात यथेच्छ फिरतात.
रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात उघड्या राहिलेल्या अन्नपदार्थांवर झुरळे मुक्तपणे फिरतात. स्वयंपाकघरात आलेली ही झुरळे सांडपाण्यातून, पायपांमधून आलेली असतात. अशा प्रकारच्या घाणीतून आलेली झुरळे अन्नपदार्थ, भांड्यांवर फिरल्यामुळे जीवजंतू अन्नपदार्थात मिसळतात.
स्वयंपाकघरात लपलेल्या झुरळांची संख्या वेगाने वाढत असते. भांड्यावरही जीवजंतू चिकटतात. यामुळे घरीच तयार केलेल्या अन्नपदार्थातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे विषबाधेसाठी पोषक ठरणाऱ्या झुरळांचा वेळीच बंदोबस्त करणे ही प्रत्येक स्वयंपाकघरातील मूलभूत गरज आहे. झुरळांचा नायनाट करणारे अनेक प्रभावशाली स्प्रे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)

स्वच्छता अत्यंत गरजेची
झुरळांमुळे काहींना अ‍ॅलर्जी असते. झुरळे अन्नपदार्थ, भांड्यावरून फिरल्याने तसेच त्या अन्नपदार्थ आणि भांड्यांचा वापर केल्याने अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना अंगाला खाज सुटते. पुरळ, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे असा त्रास जाणवू शकतो. हे टाळण्यासाठी स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ. जयेश लेले, फॅमिली फिजिशियन

कॉलराचीही असते भीती
बाहेरून घरांत येणारी झुरळे ही विष्ठेवरून, मातीवरून किंवा सांडपाण्यातून आलेली असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत जिवाणू चिकटलेले असतात. अन्नपदार्थांवर ही झुरळे फिरल्यानंतर हे जिवाणू आणि अन्य घाण अन्नपदार्थांना लागून शारीरिक त्रास होऊ शकतो. असे अन्नपदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब असा त्रास उद्भवू शकतो; तर जास्त प्रमाणात झाल्यास कॉलरा होण्याचीही शक्यता असते.
- डॉ. अनिल पाचणेकर, फॅमिली फिजिशियन

Web Title: Keep the kitchen clean, avoid the disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.