‘मला पोलीस कोठडीत ठेवा!’

By admin | Published: April 14, 2017 02:11 AM2017-04-14T02:11:48+5:302017-04-14T02:11:48+5:30

मीरारोड कॉल सेंटर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगी याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली

'Keep me in police custody!' | ‘मला पोलीस कोठडीत ठेवा!’

‘मला पोलीस कोठडीत ठेवा!’

Next

ठाणे : मीरारोड कॉल सेंटर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगी याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या वेळी न्यायालयात शॅगीने स्वत:हूनच न्यायालयीन कोठडीऐवजी पोलीस कोठडीची मागणी केली.
या कॉल सेंटर घोटाळ्याप्रकरणी ८ एप्रिल रोजी सागर उर्फ शॅगी ठक्कर याला ठाणे पोलिसांनी अटक केली. त्या वेळी त्याला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी त्याला ठाणे प्रथम न्यायदंडाधिकारी ए. बी. कट्टे यांच्या न्यायालयात हजर केले होते.
ठाणे शहर पोलिसांनी शॅगीच्या मालमत्ता, त्याने सुरू केलेली दुबईतील कंपनी, त्याची बहीण आदी बाबींची माहिती गोळा करण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. पण, त्यानेच पोलीस कोठडी मिळावी, असे न्यायालयासमोर म्हटले. न्यायालयाने त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)

बँके च्या खात्यात २५ हजार
शॅगीची अहमदाबाद येथे पाच बँक खाती आहेत. त्यातील तीन बँक खात्यांमध्ये एकूण २५ हजार रुपये असल्याचे समोर आले. दोन बँक खात्यांची माहिती मिळाली नाही. तसेच एक दुकान आणि आॅफिस अशी मालमत्ता असून त्यांची खरेदी-विक्री होऊ नये, याबाबत पोलिसांनी खबरदारी म्हणून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.

‘त्या’ १० जणांची फसवणूक
या प्रकरणी अमेरिकेतून आलेल्या एकूण ४० तक्रारींपैकी १० जणांच्या तक्रारीत मीरारोड कॉल सेंटर घोटाळ्यात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच, त्याबाबत अधिक माहिती देणे पोलिसांनी टाळले.

पुन्हा जाणार पोलीस पथक
मालमत्तेची माहिती मिळावी म्हणून शॅगीला घेऊन अहमदाबाद येथे ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि रवींद्र दौंडकर यांचे पथक गेले होते. तसेच पुन्हा ते त्याच्या मालमत्तेबाबत अधिक माहितीसाठी जाणार आहेत.

Web Title: 'Keep me in police custody!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.