मुंबई : नवरात्रौत्सवात गरबा खेळताना वाद्यवृंदांचा आवाज कमालीचा असल्याची नोंद ‘आवाज फाउंडेशन’ने केली आहे. नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत वाद्यवृंद वाजविण्याची परवानगी असली तरी या काळात ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.नवरात्रौत्सवाच्या काळात कांदिवलीत ८२ डेसिबल, बोरीवलीत ८० ते ८३ डेसिबल, कोरा केंद्र येथे ८० ते ८५ डेसिबलपर्यंतच्या आवाजाची नोंद झाली आहे. मंडळांमधील गरबा, भाषणे अशा अनेक माध्यमातून आवाजाचे प्रमाण वाढत असल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे. उर्वरित ठिकाणच्या आवाजाची नोंद घेण्याची प्रक्रिया फाउंडेशनकडून सुरू आहे.
शेवटचे तीन दिवस आवाज कमी ठेवा
By admin | Published: October 18, 2015 2:43 AM