मुंबई : पालिकेची उद्याने सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते ८ पर्यंत सुरू असतात. सर्वसामान्य व कष्टकरी जनता यावेळी कामकाजाच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना उद्यानात जाता येत नाही. जागेच्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थी उद्यानात अभ्यास करतात. परंतु, उद्यानांच्या वेळांमुळे विद्यार्थ्यांना तेथे अभ्यास करता येत नाही. मुंबईत मुळातच मोकळ्या जागांचा अभाव असल्याने अनेक मुंबईकर रात्री मुख्य रस्त्यांवर जॉगिंग करताना दिसून येतात.
अडचण लक्षात घ्यावी :
सर्वसामान्य मुंबईकरांची अडचण लक्षात घेता मुंबईतील इतर महापालिकांची उद्याने सर्व सुखसोयी, महिला-पुरुष सुरक्षारक्षकांसह सकाळी ५:३० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी खुली ठेवण्यात यावीत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांच्याकडे केली आहे.