Join us

दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच खरी वेळ- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:11 PM

काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निषेध नोंदवला आहे.

मुंबईः काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निषेध नोंदवला आहे. ते ट्विट करत म्हणाले, पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे. राज ठाकरेंनी सर्व मतभेद विसरून दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याचं आवाहन केलं आहे. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. 

जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. अतिरेक्यांनी 200 किलो स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. या ताफ्यात सीआरपीएफच्या तीन बटालियन होत्या. या तीन बटालियनमध्ये जवळपास 2500 हजार सैन्य होते. 

टॅग्स :राज ठाकरे