Video : केईएममध्ये कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ संप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 03:54 PM2019-01-04T15:54:28+5:302019-01-04T15:58:21+5:30
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
मुंबई - परळ येथील केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर त्याच्या निषेधार्थ केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
आज केईम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 33 मधील ऑपरेशन थिएटरमधील कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. नंतर रुग्णालयातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम बंद आंदोलन सुरू केले आहे. केईम रुग्णालयात दरदिवशी येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि उपलब्ध अपुरे मनुष्यबळ याबद्दल नेहमीच तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच रुग्णालयात कर्मचाऱ्याला होणाऱ्या मारहाणीचा प्रकार घडत असल्याने आज कामगारांनी काम बंद आंदोलनाचं अस्त्र उचलले आहे.