Join us

केईएमचा इंटर्न डॉक्टर बेपत्ता, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:08 AM

पालिकेच्या केईएम रुग्णालयातील इंटर्न डॉ. अजिंक्य मौर्य सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी त्यांच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयातील इंटर्न डॉ. अजिंक्य मौर्य सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी त्यांच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.डॉ. अजिंक्य येथीलच मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी अजिंक्य मेडिटेशन करत होते. संध्याकाळी त्यांनी मित्राला मला जावे लागेल एवढेच सांगितले आणि ते हॉस्टेलबाहेर पडले. दोन दिवस झाले तरी अजिंक्य यांची माहिती मिळालेली नाही. ते मोबाइलही हॉस्टेलमध्येच सोडून गेले होते.केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, ते दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. डॉ. अजिंक्य कोणालाही न सांगता नेमके कुठे निघून गेले याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ४च्या सुमारास अजिंक्यचे पालक मुंबईत आले. त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली.

केईएमचा इंटर्न डॉक्टर बेपत्तामुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयातील इंटर्न डॉ. अजिंक्य मौर्य सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी त्यांच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.डॉ. अजिंक्य येथीलच मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी अजिंक्य मेडिटेशन करत होते. संध्याकाळी त्यांनी मित्राला मला जावे लागेल एवढेच सांगितले आणि ते हॉस्टेलबाहेर पडले. दोन दिवस झाले तरी अजिंक्य यांची माहिती मिळालेली नाही. ते मोबाइलही हॉस्टेलमध्येच सोडून गेले होते.केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, ते दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. डॉ. अजिंक्य कोणालाही न सांगता नेमके कुठे निघून गेले याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ४च्या सुमारास अजिंक्यचे पालक मुंबईत आले. त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :डॉक्टर