मुंबई - काळाघोडा येथील ज्यू समाजाचे प्रार्थना स्थळ ‘दी केनेसेथ एलियाहू सिनेगॉग’ची दुरवस्था झाली होती. मात्र, आता सिनेगॉगचा कायपालट करण्यात आला आहे. केनेसेथ एलियाहू सिनेगॉगच्या स्थापत्य आणि रचनेतील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे पश्चिमेकडील दर्शनी भागावर मुकुटाप्रमाणे असलेला त्रिकोण, त्याखालील मोठी जाळीदार अर्धवतुर्ळातील तीन अनोखी स्टेन्ड-ग्लास पॅनल्स आणि त्याच्या तळाशी असलेले कोरिंथिअन स्तंभ,यांचे नुतनीकरण झाले आहे़ सिनेगॉगला मुळ सुंदरता दिल्याने परिसरातील येणाऱ्या जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे.सिनेगॉगची दुरवस्था झाल्यामुळे सर्व स्तरावरील ज्यू समाजाकडून याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. जेएसडब्ल्यु ग्रुपने सिनेगॉगला नवे रुप देऊन लवकरच ज्यू समुदायासाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले़सिनेगॉगला अत्यंत बारीक नक्षीकाम केलेल्या स्क्रीन्सवर स्टेन्ड-ग्लासच्या खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. कमानीच्या दोन्ही बाजूंना भौमितिक व फुलांची चित्रे आहेत. यामध्ये तोराह स्क्रोल्स (पवित्र ज्यु ग्रंथांचा मजकूर) आहेत. दर्शनी भागामध्ये नव्या शैलीतील अर्ध वतुर्ळाकार व तुकड्या-तुकड्यांतील जाळ्या आहेत. पश्चिम व उत्तर या दोन्ही दिशांकडील प्रवेशद्वारांवर ब्रॅकेट्सच्या आधारावर छोटे त्रिकोण बसवण्यात आले आहेत.दी केनेसेथ एलियाहू सिनेगॉग ही वास्तू देशातील ज्यु सिनेगॉग्ज पैकी एक आहे. मुंबईतील बगदादी आणि बेने इझ्रायली ज्यु समुदायाचे प्रार्थनास्थळ आहे.केनेसेथ एलियाहू सिनेगॉग वास्तूचे काय बदलले?१. तळमजल्यावरील दगडी बांधकाम सजवण्यासाठी केलेला रस्टिकेटेड प्लास्टर सिनेगॉगचे मुख्य वैशिष्ट्ये२. प्रवेशद्वार पूर्वेला असून तोराह स्क्रोल्स असलेली कमान पश्चिमेकडील जेरुसलेमच्या दिशेने आहे.३. सिनेगॉग हे इंग्लंडहून आयात केलेल्या मिण्टॉन टाइल्सने सजवलेली आहेत.४. केनेसेथ सिनेगॉगची आतील सजावट व्हिक्टोरियन शैलीत करण्यात आली आहे.५. वास्तूच्या छताची दुरुस्ती, गच्चीचे वॉटरप्रूफिंग, लाकडी राफ्टर्सच्या खराब झालेल्या भागांच्या साध्यांची दुरुस्ती तसेच बांधकामाला आधार देणाºया लाकडी भागांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.६. ग्रेप व्हाइन्स, सायट्रन फ्रुट, स्टार आॅफ डेव्हिड ही सिनेगॉगची मूळ धार्मिक चिन्हे नाहीशी झाली होती. आता ही चिन्हे पुन्हा भिंतीवर सुंदररित्या काढण्यात आली आहेत.केनेसेथ एलियाहू सिनेगॉग हा अत्यंत आव्हानात्मक आणि समाधान देणारा प्रकल्प होता. या संपूर्ण वास्तूच्या दर्शनी स्थापत्यापासून ते अंतर्गत सजावटीपर्यंत तसेच वापरलेल्या धार्मिक चिन्हांपर्यंत प्रत्येक बाबी मोहून टाकणाºया आहेत.- आभा लांबा, आर्किटेक्चर,केनेसेथ एलियाहू सिनेगॉगआमच्या सुंदर सिनेगॉगचा जीर्णोद्धार करण्यासाठी अविरतपणे मेहनत घेणाºया सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. हे सिनेगॉग स्थानिक ज्यु समुदायासाठी तसेच अभ्यागतांसाठी लवकरच खुले करण्यात येईल.- सोलोमन सोफर, अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त, सर जेकब ससून अॅण्ड अलाइड ट्रस्ट
दी केनेसेथ एलियाहू सिनेगॉगचा झाला कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 4:24 AM