“शरद पवारांचा खोटेपणा उघड, दुसरी अपेक्षा करणार तरी कशी?”; भाजपची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:35 PM2022-04-29T14:35:10+5:302022-04-29T14:36:25+5:30

हिंसाचाराच्या घटनाक्रमाबद्दल माझ्याकडे व्यक्तिगत माहिती नाही, असे शरद पवार यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

keshav upadhye replied ncp sharad pawar over criticised bjp on koregaon bhima violence case | “शरद पवारांचा खोटेपणा उघड, दुसरी अपेक्षा करणार तरी कशी?”; भाजपची घणाघाती टीका

“शरद पवारांचा खोटेपणा उघड, दुसरी अपेक्षा करणार तरी कशी?”; भाजपची घणाघाती टीका

googlenewsNext

मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना समन्स बजावण्यात आले असून, ५ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर शरद पवार यांनी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शरद पवारांचा खोटेपणा उघड झाला आहे. शरद पवार यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी कशी करणार, असा खोचक सवाल करण्यात आला आहे. 

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागून एक ट्विट करत, शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर शरद पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. हिंसाचाराच्या घटनाक्रमाबद्दल माझ्याकडे व्यक्तिगत माहिती नाही. तसेच त्यासंदर्भात राजकीय विचारसरणीबाबतही माझा आरोप नाही, असे त्यांनी म्हटले. यावरून केशव उपाध्ये यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. 

पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केले

कोरेगाव भीमा दंगलीच्या निमित्ताने शरद पवारांनी भाजपला बदनाम करण्यासाठी खोटे बोलत तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र होते, असा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्यांनी पत्र लिहिले होते. पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केल्याचा दावाही केला. परंतु आता या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पवारांनी आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याने केवळ राजकारणासाठी खोटेपणाचा वापर करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे आणि पत्रकार परिषद घेत सातत्याने भाजपाला बदनाम करावे हे दुर्दैवी म्हणावे लागेल. ज्यांचे संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून आहे, त्या शरद पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी? असा खोचक सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून विचारला आहे. 

दरम्यान, कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाची मुंबईतील सुनावणी ५ ते ११ मे या कालावधीत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील दालनात होणार आहे. त्यावेळी आयोगाने शरद पवार यांना ५ मे रोजी साक्ष नोंदण्यासाठी पाचारण केले आहे. द्विसदस्यीय चौकशी आयोगाने यापूर्वीही पवार यांना २३-२४ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्याकरिता पाचारण केले होते. मात्र, त्यावेळी पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र द्यायचे असल्याचे सांगून आयोगाला पुढची तारीख देण्याची विनंती केली होती. 
 

Web Title: keshav upadhye replied ncp sharad pawar over criticised bjp on koregaon bhima violence case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.