मुंबई: बेळगाव महापालिका निवडणूक निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडताना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, पलटवार केला जात आहे. संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा तीन अपेक्षा व्यक्त करत भाजपला थेट आव्हान दिले आहे. यावर आता भाजपने ५ प्रश्नांची यादी पुढे करत पलटवार केला आहे. (keshav upadhye replied to sanjay raut challenge to bjp after belgaum election result)
“ट्रेनला उशीर झाला तर रेल्वेच जबाबदार, प्रवाशांना भरपाई द्यावी लागणार”; सुप्रीम कोर्टाने सुनावले
महाराष्ट्र भाजपकडून दोन अपेक्षा आहेत, बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारकासमोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा, बेळगाव पालिकेत महाराष्ट्रात विलीन होण्याबाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा आहे मंजूर, असा सवाल करत अहंकार बाजूला ठेवून हे एवढे कराच!, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मोदी सरकारची ‘या’ कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे!
या ५ प्रश्नांची उत्तर द्या, एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?
उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे… अजान स्पर्धा घेणारे… टीपू सुलतान जयंती साजरी करणारे… आपल्या हिंदूहृदयसम्राट दैवताला जनाब म्हणणारे… स्वतःच्या वसुलीसाठी पोलिस वापरणारे… खरंच मराठी असतात का हो? या ५ प्रश्नांची उत्तर द्या एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव
बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.