केतन तिरोडकरला अटक, सायबर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:29 AM2017-12-08T04:29:25+5:302017-12-08T09:39:25+5:30

सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करून खळबळ उडविणारा पत्रकार तसेच आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला (५२) गुरुवारी सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

Ketan Tirodkar detained, cyber police action | केतन तिरोडकरला अटक, सायबर पोलिसांची कारवाई

केतन तिरोडकरला अटक, सायबर पोलिसांची कारवाई

Next

मुंबई : सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करून खळबळ उडविणारा पत्रकार तसेच आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला (५२) गुरुवारी सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुलै २०१७मध्ये दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
इंंग्रजी वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर तिरोडकरने काही काळ पोलीस खबरी म्हणून काम केले. त्याच्या माहितीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवायाही केल्या होत्या. पुढे पोलिसांविरुद्धच्या भूमिकेमुळे तो चर्चेत आला. न्यायाधीश, राष्ट्रवादी आणि पोलीस अधिकाºयांविरुद्ध त्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध राज्यभरात गुन्हे दाखल आहेत. नुकतेच रिया पालांडे आत्महत्या प्रकरणानंतर त्याने गुन्हा दाखल असलेल्या पोलीस कुटुंबाच्या बाजूने वक्तव्य करत पोलीस आयुक्तांनाच टार्गेट केले. अशात त्याला पकडण्याचे खुले आव्हानही त्याने फेसबुकवरून बुधवारी दिले होते.
सोशल मीडियावर पोलीस आयुक्त, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध तिरोडकरकडून आक्षेपार्ह पोस्ट टाकणे सुरू असतानाच गुरुवारी त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. जुलै २०१७मध्ये तिरोडकरने एका महिलेच्या बदनामीची पोस्ट व्हायरल केली होती. त्यानुसार, २१ जुलै रोजी तिरोडकरवर विनयभंग, शिवीगाळ, आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात सायबर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. न्यायालयाने त्याला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Ketan Tirodkar detained, cyber police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.