केतकी चितळे ट्रोल प्रकरण: सोशल मीडियावरील डमी, खोट्या अकाउंटवर कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:41 AM2019-06-19T04:41:17+5:302019-06-19T04:41:36+5:30
मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळास आश्वासन
मुंबई : सोशल मीडियावर डमी अकाउंटद्वारे महिला अभिनेत्री आणि महिलांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शिवसेना उपनेत्या नीलम गोºहे यांनी दिली.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केतकीने तिला फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांची माहिती दिली आहे. या प्रकरणी ट्रोलरवर कारवाईच्या मागणीसाठी गोºहे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष विजय औटी यांची शिष्टमंडळसह भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर डमी आणि खोट्या अकाउंटवरून अश्लील भाषेत ट्रोल करणाºयांना अटक करून, कडक कारवाईसाठी पोलीस उपायुक्त क्राइम यांना तत्काळ सूचना दिल्या आहेत. डमी अकाउंटद्वारे महिलांचे विनयभंग करणाºयांवर कडक करवाईचे आश्वासन दिल्याचे गोºहे यांनी सांगितले. या शिष्टमंडळात अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेता दिगंबर नाईक, सुशांत शेलार, प्रकाश वालावलकर होते. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले.
सध्या सोशल मीडियावर खोट्या आणि डमी नावाने अकाउंट उघडून महिला, तसेच अभिनेत्रींना अश्लील भाषेत व खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल केले जात आहे. असे अकाउंट बंद करून त्याच्या युजर्सवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी
शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली की, सोशल मीडियावरील खोटे अकाउंट बंद करण्यासाठी फेसबुकने पुढाकार घेतला आहे. परंतु टिष्ट्वटर, तसेच इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियावरील खोटे व डमी अकाउंट बंद करण्यासाठी सरकारने पाठपुरावा करावा, तसेच फेसबूक, टिष्ट्वटर यासारख्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास संबंधितावर कारवाईची मुभा देणारे आयटी अॅक्टचे कलम ६६(अ) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे, परंतु आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात यावा.