coronavirus : केतकीपाड्यातील युवकाची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:58 AM2020-04-27T01:58:19+5:302020-04-27T01:58:33+5:30

दोन दिवसांपूर्वी येथील एक महिला कोरोनामुक्त झाली होती. त्यामुळे केतकीपाडा परिसर आता पूर्णत: कोरोनामुक्त झाला आहे.

Ketkipada youth overcomes corona | coronavirus : केतकीपाड्यातील युवकाची कोरोनावर मात

coronavirus : केतकीपाड्यातील युवकाची कोरोनावर मात

Next

मुंबई : दहिसर (पूर्व) केतकीपाडा येथे राहणारा एक ३१ वर्षीय युवक आज कोरोनामुक्त होऊन घरी परतला. दोन दिवसांपूर्वी येथील एक महिला कोरोनामुक्त झाली होती. त्यामुळे केतकीपाडा परिसर आता पूर्णत: कोरोनामुक्त झाला आहे.
दरम्यान, आपल्यामुळे शेजाऱ्यांना नाहक त्रास झाल्याची खंत व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टर, सर्व कर्मचारी व हितचिंतकांमुळे मी यावर मात केल्याचे या युवकाने सांगितले. शिवसेना शाखा क्रमांक ३चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो,’ असे आवाहन केले. त्यानुसार आपण अनावश्यक घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडायची आहे. या संकटसमयी महापालिका डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस प्रशासन एकजुटीने याचा मुकाबला करत आहेत. आज खासगी दवाखाने बंद असताना महापालिकेचे दवाखाने सुरू आहेत.

Web Title: Ketkipada youth overcomes corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.