इस्लाम धर्मसंस्कृतीत रमजान हा पवित्र, त्यागाचा महिना मानला जातो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संपूर्ण उपवास (रोजा) करून संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी उपवास सोडणे हा एक विशेष सोहळा असतो. यावेळी विविध प्रकारचे, चवीचे पदार्थ केले जातात. या खाद्यसंस्कृतीवर नजर...
......................
इस्लामचा धर्मसंस्कृतीचा उदय मध्यपूर्वेतील वाळवंटी प्रदेशातून होऊन पुढे तो सर्वत्र विस्तारला आणि रुजला. त्यामुळेच येथून सुरू झालेल्या खाद्यसंस्कृतीचा प्रवास देशप्रदेशानुसार बदलत गेला, वाढत गेला व बहरत गेला. वाळवंटी प्रदेशातील प्रामुख्याने खजूर, सुका मेवा यांतून पुढे दूधदुभते असणाऱ्या प्रदेशातील संस्कृतीमध्ये हा धर्म रुजल्यावर शीरखुर्मा (खीर) व इतर पदार्थ यात अंतर्भूत होत गेले असावेत.
सर्वसाधारणपणे लोक खजूर व पाण्याने उपवास सोडतात आणि ही परंपरा बऱ्याच वर्षांपासून आहे. उपवास सोडण्यासाठी गोड नसलेले तरीही चविष्ट, पौष्टिक असेही पदार्थ वेगवेगळ्या प्रांतांत केले जातात. रमजानमध्ये खाणे हा एक आशीर्वाद आहे असे मानले जाते. इफ्तारीदरम्यान लोक वेज रोल, साबूदाणा वडा, वेज टाक, समोसा, दहीवडा, वेज कँडी, वेज समोसा आणि फळे असे बरेच काही खातात. मुंबईतील महंमद अली रोड व इतर काही भाग हे रमजानच्या खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहेत. येथे भांडोली हा पदार्थ मिळतो. भांडोली हा मालपुआपेक्षा आकाराने लहान आणि गोड असतो. रमजानच्या वेळी विविध लहान पॉप-अप गोड-गोड पदार्थ बनवितात.
बेकरीमध्ये तयार केलेला, अफलाटून म्हणजे खोया, साखर, कोरडी फळे आणि इतर घटकांचे एक जड मिश्रण. मधुर आणि भरणे, एक गोड सर्व्हिंग आपल्याला तृप्त करते. सुतारफेणी एक फ्लेकी, सुती कँडी-एस्क गोड आहे. बारीक चिरलेला पिस्ता आणि बदामासह टॉपवर सुतारफेणी दुधात घालावी, वेलची फ्लेव्हरमध्ये अधिक सुमधुर लागते. बटाटा चॅट एक लोकप्रिय डिश आहे, ज्याला इफ्तारसाठी प्राधान्य दिले जाते. केशर शोर्बा, भाजलेले वांगे आणि गोड बटाटे हे बेंगलुरूमध्ये खाल्ले जाते. हांडवो हे गुजरातमध्ये खाल्ले जाते. पोरियाल हे केरळ आणि दक्षिण भारतात खाल्ले जाते. कोलकातामध्ये लोक पकोडे, फळ आणि घुग्णी (काळा हरभरा) खातात. खजला, तळलेला पोकळ ब्रेड जो चुरलेला असतो आणि गरम दुधासह खाल्ला जातो. शीरमल आणि बकरखानी हे रमजानचे अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहेत.
दिल्लीतील काही प्रसिद्ध रेस्टॉरंट्समध्ये खास डाळ माखनी, पनीर टिक्का यासारख्या लोकप्रिय डिशेस दिल्या जातात. रबडीसह जाड जिलेबी हे काॅम्बिनेशन अफलातून असते. टर्कीमध्ये लोक उपवास सोडण्यासाठी पिडेसी खातात. पिडेसी हा एक फ्लॅटब्रेड आहे जो सामान्यत: यीस्ट किंवा गव्हाच्या पिठापासून बनविला जातो आणि त्याला हाताने आकार दिला जातो. पिडेसी नेहमीच तिळांसह अप्रतिम लागते. ते भाजीत भरले जाते. इजिप्तमध्ये लोक सामान्यत: कटायफ खाऊन उपवास सोडतात. हे मध्य-पूर्वेचे डंपलिंग्ज परिपूर्ण आणि आनंददायक आहेत; कारण त्यात चीज, काजू, मनुका भरलेले आहेत.
रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्नपाण्यापासून दूर राहून भुकेची यातना सहन करणे एवढेच नव्हे तर मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक. महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून-सुलाखून निघालेल्या रोजदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच.
- रोहित सरिता प्रशांत पाठक
(लेखक ऑस्ट्रियामध्ये शेफ आहेत.)