Join us  

खड्डेच खड्डे चोहीकडे़

By admin | Published: May 26, 2014 3:43 AM

पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असतानाच मुंबई महापालिका प्रशासन शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी हातपाय मारत आहे

मुंबई : पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असतानाच मुंबई महापालिका प्रशासन शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी हातपाय मारत आहे. मात्र, त्यांच्या रस्त्यांखेरीज उर्वरित प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारीदेखील महापालिकेची असून या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत़ अशा खड्ड्यांची संख्या ६६५ आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत महापालिकेव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खाते, म्हाडा, टाटा, रिलायन्स आणि एमटीएनएल अशा उर्वरित प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर खड्डे खड्डेच आहेत. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी पालिकेची असून त्या मोबदल्यात संबंधित प्राधिकरणाकडून महापालिकेला रक्कम अदा केली जाते. नागरिकांना खड्ड्यांची नोंद करता यावी म्हणून सुरूू करण्यात आलेल्या ‘व्हॉइस आॅफ सिटीजन’ या संकेतस्थळावरील सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार उर्वरित प्राधिकरणांच्या रस्त्यांवर ६६५ खड्डे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)