Join us  

डहाणू तालुक्यातील रस्त्यावर खड्डेच खड्डे

By admin | Published: July 28, 2014 12:14 AM

डहाणू तालुक्यातील अनेक रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तर बांधकाम विभागाचे अधिकारी निद्रिस्त झाल्याचे चित्र आहे

दापचरी : डहाणू तालुक्यातील अनेक रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तर बांधकाम विभागाचे अधिकारी निद्रिस्त झाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील प्रमुख रस्त्यावर हळदपाडा (हायवे नं. ८) ते उधवा या महामार्गाची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच वाणगाव-डहाणू या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याकडेही बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे, तर ग्रामीण भागातील रस्त्याचे चित्र आणखीनच विदारक आहे.हळदपाडा ते उधवा महामार्गावरील ग्रामपंचायत कार्यालयासमोर व संपत जुगल यांच्या घरासमोर सर्वांत मोठा खड्डा पडलेला आहे. खड्ड्यामधून सर्वांत खालचा मोठी खडी असलेला थर बाहेर निघालेला आहे, तर मोडगाव व पुढील रस्त्यामध्ये असंख्य खड्डे दिसत आहेत. डहाणू-वाणगाव रस्त्यावर कापसीफाटा जवळील रस्ता, डेहणेपळेजवळील रस्ता, सावटा ब्रीजच्या बाजूच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. (वार्ताहर)