खग्रास चंद्रग्रहणाची आज पर्वणी! सायंकाळी ५.३२ वाजता दिसणार, राज्यात कुठे किती वाजता चंद्रग्रहण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 06:42 AM2022-11-08T06:42:34+5:302022-11-08T06:42:47+5:30
संपूर्ण देशात आज चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारताच्या काही भागांत काही काळ खग्रास चंद्रग्रहण दिसेल
नागपूर :
संपूर्ण देशात आज चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारताच्या काही भागांत काही काळ खग्रास चंद्रग्रहण दिसेल; पण देशाच्या उर्वरित भागात ते खंडग्रास दिसेल. महाराष्ट्रात गडचिराेली येथे सर्वांत आधी सायंकाळी ५.२९ वाजता ते दिसेल. नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल. चंद्र हा ग्रहणातच उगवलेला असेल. तब्बल दाेन तास हा साेहळा अनुभवता येणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका
रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण हाेईल.
दुपारपासून सुरुवात
अवकाशात चंद्रग्रहणाला दुपारपासूनच सुरुवात हाेईल. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशातून सायंकाळी ४.२३ वाजता चंद्र क्षितिजावर आल्यानंतर खग्रास दिसेल. ईशान्य भागात ग्रहण ९८ टक्के आणि ३ तास दिसेल. त्यानंतर, ते खंडग्रास हाेण्यास सुरुवात हाेईल.
कुठे किती वाजता चंद्रग्रहण?
नागपूर सायं. ५.३२ वा.
गडचिराेली सायं. ५.२९ वा.
चंद्रपूर सायं. ५.३३ वा.
यवतमाळ सायं ५.३७ वा.
अकोला सायं ५.४१ वा.
जळगाव सायं. ५.४६ वा.
औरंगाबाद सायं. ५.५० वा.
नाशिक सायं. ५.५५ वा.
पुणे सायं. ५.५७ वा.
मुंबई सायं ६.०१ वा.