खारघर गोल्फ कोर्सच्या शुल्कात वाढ

By admin | Published: July 6, 2016 02:35 AM2016-07-06T02:35:20+5:302016-07-06T02:35:20+5:30

खारघर येथील व्हॅली गोल्फ कोर्सच्या शुल्कात सिडकोने वाढ केली आहे. या कोर्सचे सुधारित दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एका व्यक्तीला शनिवार, रविवार व सार्वजनिक

Khargha Golf Course costs increased | खारघर गोल्फ कोर्सच्या शुल्कात वाढ

खारघर गोल्फ कोर्सच्या शुल्कात वाढ

Next

नवी मुंबई : खारघर येथील व्हॅली गोल्फ कोर्सच्या शुल्कात सिडकोने वाढ केली आहे. या कोर्सचे सुधारित दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एका व्यक्तीला शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी दोन तासांसाठी १२00 रुपये शुल्क लागणार आहे, तर इतर दिवशी हे शुल्क ६00 रुपये इतके असणार आहे. सिडकोने जाहीर केलेल्या या सुधारित दरपत्रकांमुळे सर्वसामान्य गोल्फप्रेमींची मात्र निराशा झाली आहे.
खारघर येथील सेंट्रल पार्कजवळ सिडकोने ९ होल्सचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स विकसित केले आहे. या कोर्सला नवी मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील गोल्फप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे परदेशी नागरिकांसाठी सुध्दा हा कोर्स आकर्षण ठरला आहे. असे असले तरी गोल्फ कोर्सप्रेमींना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्याचा सिडकोचा हेतू आहे. त्यामुळे कोर्सच्या शुल्कात वाढ केल्याचा दावा सिडकोच्या वतीने करण्यात आला आहे. त्यानुसारगोल्फ कोर्सच्या हरित क्षेत्रात खेळण्यासाठी वैयक्तिक, विद्यार्थी (इयत्ता १२ वी),सिडकोचे आजी-माजी कर्मचारी आणि परदेशी व्यक्तींसाठी हे सुधारित दरपत्रक तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून इतर दिवसांसाठी ३00 रुपये तर सिडकोच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्यांच्या दिवशी ६00 रुपये आणि इतर दिवशी ३00 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
परदेशी नागारिकांना शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी २४00 रुपये तर इतर दिवशी १२00 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गोल्फ शिकण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी सुध्दा सुधारित दरपत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गोल्फ कोर्टच्या भाडेदरातही वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Khargha Golf Course costs increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.