Join us

मेट्रोमुळे खारघरवासी त्रस्त

By admin | Published: July 30, 2014 12:25 AM

बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेच्या कामामुळे खारघरवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील सर्व रस्त्यांवर मोठय़ाप्रमाणात खड्डे पडले आहेत.

वैभव गायकर - नवी मुंबई
बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेच्या कामामुळे खारघरवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील सर्व रस्त्यांवर मोठय़ाप्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून या कामाचा फटका शहरवासीयांना बसू लागला आहे. 
सिडकोने मे 2क्11 मध्ये बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या मेट्रो रेल्वेच्या मार्गाचे काम सुरू केले आहे. 2क्14 अखेर मेट्रो धावेल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मार्गाचे काम करताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने  नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. भारती विद्यापीठजवळ  खोदकाम करण्यात आले असून याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.  पूर्ण मार्गावर  खड्डे पडले आहेत.  उत्सव चौक येथे जाणारा रस्ता मेट्रोच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे.  त्यामुळे एकाच मार्गिकेवरून  दोन्ही बाजूच्या गाडय़ा जात असून अपघाताची शक्यता वाढली आहे. मेट्रोचा हा मार्ग 11. 1क् किलोमीटरचा आहे. खारघर शहरामधून हा मार्ग गेला आहे. 
मेट्रोचे काम 7क् टक्के पूर्ण देखील झाले आहे. ज्या ठिकाणी ट्रॅक बांधणीचे काम पूर्ण झाले आहे तेथील ट्रॅकखाली अनधिकृत पार्किग सुरू झाले आहे. रस्त्यावरही वाहने उभी रहात असल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होवू लागली आहे. येथील सेक्टर 12 मधील वर्दळीच्या ठिकाणी असलेले खड्डे बुजविले होते. परंतु आता पूर्वीप्रमाणो स्थिती झाली आहे.  याठिकाणच्या रस्त्याचे कांक्र ीटिकरण केल्यामुळे  खड्डे पडणार नाहीत. रस्ते मजबूत होतील, हा उद्देश समोर ठेवून  सिडकोने 5क्  कोटी रु पये खर्च करून मेट्रोच्या  मार्गातील रस्त्याचे काँक्र ीटिकरण करण्याचा निर्णय मागच्या वर्षी  घेतला होता.  सिडकोच्या संचालक मंडळाने या कामाला मंजुरी देखील दिली होती. मात्न या निर्णयाचे पुढे काय झाले असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. 
सिडकोने मेट्रोसाठी निश्चित केलेल्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. 2क्16 र्पयत काम चालेल असेही बोलले जात आहे. वेगवान वाहतुकीसाठी सिडको मेट्रो रेल्वे सुरू करणार असली तरी पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग आत्ता मंदावला आहे. वेळेत या समस्या सोडविल्या नाहीत  तर नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली 
आहे. 
 
ग्रामपंचायतीने सिडको अधिका:यांची भेट घेवून खड्डय़ांचा प्रश्न सोडविण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
- वनिता पाटील, सरपंच, खारघर
गत आठवडय़ात व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी संबंधित अधिका:यांसोबत बैठक घेतली होती. खारघरमधील रस्ते, मेट्रो परिसरातील समस्या यावर तोडगा काढण्यासंदर्भात सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 
- मोहन निनावे, 
जनसंपर्क अधिकारी, सिडको