महाराष्ट्रातील पैलवानांना सरकार अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा पुरविणार- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 03:47 PM2018-04-16T15:47:07+5:302018-04-16T15:47:07+5:30

आवश्यकता असल्यास त्या पैलवान खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी सरकार सहकार्य करेल

Khashaba Jadhav wrestling competition | महाराष्ट्रातील पैलवानांना सरकार अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा पुरविणार- विनोद तावडे

महाराष्ट्रातील पैलवानांना सरकार अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा पुरविणार- विनोद तावडे

Next

मुंबई दि. १६ एप्रिल -  स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेतील प्रत्येक गटातील दोन-दोन विजयी पैलवान खेळांडूची निवड करुन त्यांना अनिवासी क्रिडा प्रबोधिनीमध्ये अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देऊ. तसेच आवश्यकता असल्यास त्या पैलवान खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मकरित्या सहकार्य करेल, असे ठाम प्रतिपादन क्रीडा मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.विनोद तावडे यांनी येथे केले.

राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद तसेच मुंबई उपनगर जिल्हा पूर्व व पश्चिम तालीम संघ आणि विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती यांच्यावतीने मुंबई उपनगरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय चौथी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा (पुरुष व महिला) समारोप रविवारी शानदारपणे पार पडला. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा अंतिम पारितोषिक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार मंगेश कुडाळकर, पैलवान नरसिंह यादव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राला गौरव वाटेल अशी ही कुस्ती स्पर्धा आहे. यंदाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्य सरकारच्या वतीने उत्तमरित्या करण्यात आले, त्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू व पंच यांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या असेही श्री.तावडे यांनी सांगितले. या स्पर्धेतील पैलवानांनी येथे उत्तम कामगिरी केली असून भविष्यात हेच पैलवान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी करतील असा विश्वासही श्री. तावडे यांनी व्यक्त केला. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष महिला) २०१७-१८ च्या स्पर्धांमध्ये फ्री स्टाईल गट, ग्रीको रोमन गट, तर फ्री स्टाईल गट  यामध्ये ३६० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये ३० सुवर्ण, ३० रौप्य व ६० कांस्य पदके वितरण करण्यात आली.

 

स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे-

फ्री स्टाईल (वजन गट ५७ किलो)

प्रथम- ज्योतिबा अटकळे (सोलापूर)
व्दितीय- विक्रम मोरे (कोल्हापूर)
तृतीय- स्वप्नील शेलार (पुणे)
तृतीय- विकी चव्हाण ( नाशिक )


फ्री स्टाईल (वजन गट ६१ किलो)

प्रथम –सौरव पाटील (कोल्हापूर)
व्दितीय – दत्ता भोसले (लातूर)
तृतीय –प्रदीप सूळ (सातारा)
तृतीय – आबासाहेब अटकळे (सोलापूर)

फ्री स्टाईल (वजन गट ६५ किलो)

प्रथम- अक्षय हिरगुडे (कोल्हापूर)
व्दितीय- तुकाराम शितोळे (पुणे)
तृतीय- निखिल कदम (पुणे)
तृतीय- आकाश अस्वले ( सोलापूर)

फ्री स्टाईल (वजन गट ७४ किलो)

प्रथम- राकेश तांबूलकर (कोल्हापूर)
व्दितीय- विशाल राजगे (सातारा)
तृतीय- अलिम गुलाम शेख (लातूर)
तृतीय- सागर खोपडे ( पुणे शहर)


फ्री स्टाईल (वजन गट ७९ किलो)

प्रथम – अक्षय चोरघे (पुणे)
व्दितीय – चंद्रशेखर पाटील (लातूर)
तृतीय – श्रीधर मुळीक (सातारा)
तृतीय – विजय सुरुडे (नाशिक)


फ्री स्टाईल (वजन गट ८६ किलो)

प्रथम – राजेंद्र सूळ (सातारा)
व्दितीय – अभिषेक तुर्केवाडकर (मुंबई)
तृतीय – अक्षण कावरे (अहमदनगर)
तृतीय – अनिकेत खोपडे (पुणे)


फ्री स्टाईल (वजन गट ९२ किलो)

प्रथम – सिकंदर शेख (सोलापूर)
व्दितीय – विक्रम शेट (अहमदनगर)
तृतीय – रोहन रंडे (कोल्हापूर)
तृतीय – अक्षय भोसले (पुणे)

फ्री स्टाईल (वजन गट ९७ किलो)

प्रथम – संतोष गायकवाड (अहमदनगर)
व्दितीय – आदर्श दिनेश गुंडे (पुणे)
तृतीय – अमित पावले(पुणे शहर)
तृतीय – सुरज मुलानी (सोलापूर)

फ्री स्टाईल (वजन गट १२५ किलो)

प्रथम – शुभम सिध्दनाळे (कोल्हापूर)
व्दितीय – हर्षद सदगीरे (नाशिक)
तृतीय – तानाजी झिजुरके (पुणे)
तृतीय – विकास धोत्रे


ग्रीको रोमन (वजन गट ५५ किलो)

प्रथम- अभिजीत पाटील (कोल्हापूर)
व्दितीय- समाधान चव्हाण (पुणे)
तृतीय- विष्णु कांबळे (कोल्हापूर)
तृतीय- चेतन मरगजे ( सातारा)


ग्रीको रोमन (वजन गट ६० किलो)

प्रथम- गोविंद यादव (मुंबई)
व्दितीय- शुभम ढमाल (सातारा)
तृतीय- रविंद्र लोहार (सोलापूर शहर)
तृतीय- प्रतिक आवारे ( पुणे)


ग्रीको रोमन (वजन गट ६३ किलो)

प्रथम- विक्रम कु-हाडे (कोल्हापूर जि.)
व्दितीय- विशाल कोंडेकर (कोल्हापूर श.)
तृतीय- दत्तात्रय काळे (पुणे शहर)
तृतीय- संदीप बिराजदार (मुंबई)


ग्रीको रोमन (वजन गट ६७ किलो)

प्रथम- प्रितम खोत (कोल्हापूर जि.)

व्दितीय- पंकज पवार (लातूर)

तृतीय- मंगेश तपकिरे (पिंपरी चिंचवड)

तृतीय- कुंदन यादव ( मुंबई)

ग्रीको रोमन (वजन गट ७२ किलो)

प्रथम – दिनेश मोकाशी (पुणे शहर)

व्दितीय – नितीन पोवार (कोल्हापूर शहर)

तृतीय – सागर पाटील (कोल्हापूर)

तृतीय – धिरज भोसले (पुणे)

ग्रीको रोमन (वजन गट ७७ किलो)

प्रथम- गोकुळ यादव (मुंबई)

व्दितीय- शशिकांत कांबळे (लातूर)

तृतीय- तुषार पोकळे (पुणे शहर)

तृतीय- तानाजी विरकर ( सातारा)


ग्रीको रोमन (वजन गट ८२ किलो)

प्रथम – मंगेश कराड (लातूर)
व्दितीय – सतिष अडसूळ (कोल्हापूर)
तृतीय – किशोर नखाते (पि. चिंचवड)
तृतीय – चंदन यादव (मुंबई उपनगर)

ग्रीको रोमन (वजन गट ८७ किलो)

प्रथम – योगेश शिंदे (पुणे)
व्दितीय – बाळासाहेब सपाटे (सोलापूर)
तृतीय – हर्षल जगवाडे (सोलापूर)
तृतीय – इंद्रजित मगदुल (कोल्हापूर)

ग्रीको रोमन (वजन गट ९७ किलो)

प्रथम – विवेक यादव (मुंबई)
व्दितीय – अर्जुन साठे (सोलापूर शहर)
तृतीय – योगेश जाधव (सोलापूर)
तृतीय – राहूल चव्हाण (सातारा)

ग्रीको रोमन (वजन गट १३० किलो)

प्रथम – शैलेष शेळके (लातूर)
व्दितीय – तुषार डिंबळे (पुणे)
तृतीय – अब्दुल पटेल (कोल्हापूर)
तृतीय – आकाश पुजारी (सोलापूर)

 

महिला (वजन गट ५० किलो)

प्रथम – प्रगती ठोंबरे (बीड)
व्दितीय – प्रज्ञा वरकाळे (कोल्हापूर)
तृतीय – शिवानी सुतार (सांगली)
तृतीय – अमृता यादव (ठाणे शहर)

महिला (वजन गट ५३ किलो)

प्रथम – नंदिनी साळोखे (कोल्हापूर)
व्दितीय – कोमल देसाई (ठाणे)
तृतीय – प्रियंका सणस (मुंबई)
तृतीय – ज्योती शिंदे (सांगली)

महिला (वजन गट ५५ किलो)

प्रथम – अंजली पाटील (सांगली)
व्दितीय – प्रतिक्षा मुंढे (बीड)
तृतीय – प्राजक्ता पानसरे (ठाणे शहर)
तृतीय – यशश्री खेडेकर (पुणे)

महिला (वजन गट ५९ किलो)

प्रथम – सोनाली तोडकर (बीड)
व्दितीय – प्रतिक्षा देबांजे (कोल्हापूर)
तृतीय – संगिता टेकाम (भंडारा)
तृतीय – प्रितम दाभाडे (पुणे)

महिला (वजन गट ६२ किलो)

प्रथम – अंकिता दिनेश गुंड (पुणे)
व्दितीय – सरोज पवार (ठाणे शहर)
तृतीय – हर्षदा मगदुम (सांगली)
तृतीय – भाग्यश्री भोईर (कल्याण)
महिला (वजन गट ६५ किलो)

प्रथम – मनाली जाधव (ठाणे)
व्दितीय – निकिता ढवळे (अहमदनगर)
तृतीय – भारती शिंदे (मुंबई उपनगर)
तृतीय – राजश्री जगताप (पुणे)

महिला (वजन गट ६८ किलो)

प्रथम – गिता चौधरी (भंडारा)
व्दितीय – स्मिता साळूंखे (ठाणे शहर)
तृतीय – समृध्दी भोसले (पुणे)
तृतीय – मनिषा काळे (मुंबई उपनगर)

 

महिला (वजन गट ७२ किलो)

प्रथम- मनिषा दिवेकर (पुणे)
व्दितीय- प्रियंका दुबले (सांगली)
तृतीय- सेजल खोपडे (मुंबई)
तृतीय- अनुराधा अल्हार ( ठाणे)

 

महिला (वजन गट ७६ किलो)

प्रथम- वर्षाराणी पाटील (मुंबई उपनगर)
व्दितीय- स्वाती पाटील (सांगली)
तृतीय- प्रतिक्षा परहर (अहमद नगर)
तृतीय- मयुरी शिरसाठ ( पुणे जिल्हा)

Web Title: Khashaba Jadhav wrestling competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.