दहावी बोर्ड परीक्षेत मिळणा-या अतिरिक्त गुणांच्या खैरातीला चाप, शिक्षण मंडळाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:02 AM2017-11-25T06:02:50+5:302017-11-25T06:03:26+5:30
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अन्य मंडळातील विद्यार्थ्यांना मिळणा-या गुणांचे प्रमाण कमी होते.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अन्य मंडळातील विद्यार्थ्यांना मिळणा-या गुणांचे प्रमाण कमी होते. राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळावेत म्हणून मंडळाने कला, क्रीडामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यास सुरुवात केली. पण, यामुळे दहावीचा निकालाची टक्केवारी वारेमाप वाढली. अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळू लागले. त्यामुळे आता कला, क्रीडा प्रावीण्य मिळवणाºया विद्यार्थ्यांच्या गुणांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. सन २०१६-१७ म्हणजेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा नियम लागू होणार आहे.
या नव्या नियमानुसार शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त संस्थेच्या सलग ३ परीक्षा अथवा ५ परीक्षा दिल्या असतील त्या गुण देण्याची टक्केवारीदेखील ठरवून देण्यात आली आहे.
पाश्चात्य नृत्याकरिता सवलतीचे गुण देण्यात येणार नाहीत. इयत्ता ७ वी, ८ वी, ९ वी आणि १० वी या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने प्रयोगात्मक लोककला प्रयोग सादर केले असल्यास त्या आधारावर त्याला गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय बालनाट्य या स्पर्धेत वैयक्तिक यश संपादन करणाºया विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत.
चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणाºया विद्यार्थ्याला १० गुण तर राज्यस्तरावर पुरस्कार मिळवणाºया विद्यार्थ्याला ५ गुण दिले जातील. तसेच इंजरमिजिएट चित्रकला परीक्षेसाठी विद्यार्थ्याला ‘अ’ श्रेणी प्राप्त झाल्यास ७ गुण, ब श्रेणी प्राप्त झाल्यास ५ गुण, क श्रेणी प्राप्त झाल्यास ३ गुण दिले जाणार आहेत.