१२ लाख आदिवासींच्या खात्यात खावटी रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:33 AM2021-05-02T06:33:35+5:302021-05-02T06:34:02+5:30

महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

Khawti amount deposited in the account of 12 lakh tribals | १२ लाख आदिवासींच्या खात्यात खावटी रक्कम जमा

१२ लाख आदिवासींच्या खात्यात खावटी रक्कम जमा

Next
ठळक मुद्देआदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील १२ लाख आदिवासी कुटुंबांच्या बँक खात्यात खावटीची प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झाली. खावटी वाटपाचा प्रारंभ मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आला
आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदानाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी, आ. सुनील भुसारा, आ. विनोद निकोले, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.

आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. आपण सर्वांनी पुढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना शासनासमोर आणाव्यात, शासन आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन ठाकरे यांनी या वेळी केले. या वेळी आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी म्हणाले की, खावटी कर्ज योजना पुनर्जीवित करून कर्जाऐवजी अनुदान देणारी ही योजना कोरोनाच्या संकटकाळात राज्याने आणली आहे. एकाच वेळी १२ लाख कुटुंबांना आज या योजनेचा आपण ऑनलाइन लाभ उपलब्ध करून देत आहोत.

Web Title: Khawti amount deposited in the account of 12 lakh tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.