खिचडी घोटाळा प्रकरणी खा. गजानन कीर्तिकरांच्या मुलाची ४ तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 05:41 AM2023-09-21T05:41:20+5:302023-09-21T05:42:04+5:30

प्रश्नांची झाली सरबत्ती, बुधवारी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांनाही समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते

Khichdi scam case MP Gajanan Kirtikar's son Amol Kirtikar was interrogated for 4 hours | खिचडी घोटाळा प्रकरणी खा. गजानन कीर्तिकरांच्या मुलाची ४ तास कसून चौकशी

खिचडी घोटाळा प्रकरणी खा. गजानन कीर्तिकरांच्या मुलाची ४ तास कसून चौकशी

googlenewsNext

मुंबई - खिचडी घोटाळा प्रकरणी बुधवारी शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र व युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चार तास चौकशी केली गेली. खिचडी संबंधित कंत्राटाबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. 
कोरोना काळात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला कोविड सेंटर उभारणी, डाॅक्टर व कर्मचारी पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषध खरेदी अशी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देऊन झालेल्या घोटाळ्यासह अन्य घोटाळा प्रकरणांचीही प्राथमिक चाैकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून होत आहे.

गरज पडल्यास पुन्हा बोलावणार
त्यापाठोपाठ बुधवारी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांनाही समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, ते चौकशीला हजर झाले. त्यांच्याकडे खिचडी वाटप प्रकरणातील कंत्राटाबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यांचे कंत्राटदार नेमणुकीबाबत कुणाशी बोलणे झाले होते का? यासह विविध प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलवण्यात येऊ शकते, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Khichdi scam case MP Gajanan Kirtikar's son Amol Kirtikar was interrogated for 4 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.