Raj Thackeray Grandson: 'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:24 PM2022-05-06T13:24:56+5:302022-05-06T13:36:15+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचं बारसं झालं आहे.

kiaan thackeray grandson of raj thackeray know all details in marathi mns | Raj Thackeray Grandson: 'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा...

Raj Thackeray Grandson: 'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा...

googlenewsNext

मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचं बारसं झालं आहे. ठाकरे कुटुंबात आगमन झालेल्या नव्या पाहुण्याचं नामकरण किआन ठाकरे असं करण्यात आलं आहे. शिवतीर्थवर आज अमित ठाकरे यांच्या तान्हुल्याचा नामकरण सोहळा पार पडला. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नामकरणाचा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. 

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. अमित-मिताली यांना पूत्ररत्न झाल्यापासून 'शिवतीर्थ'वर एक वेगळाच आनंद व्यक्त होत आहे. मुंबईतच राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, कारण मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे.

२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.

किआन नावाचा नेमका अर्थ
'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे.  किआन हे मूळ संस्कृत नाव असून याचा अर्थ देवाचा आशीर्वाद असा होतो. किआन हे भगवान विष्णूचे दुसरे नाव आहे. 

Web Title: kiaan thackeray grandson of raj thackeray know all details in marathi mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.