Video : गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा १५ तास उलटूनही बेपत्ता; शोधकार्य सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 03:24 PM2019-07-11T15:24:48+5:302019-07-11T15:27:51+5:30
उघड्या नाल्यात खेळता खेळता पडला ३ वर्षाचा चिमुरडा
मुंबई - गोरेगाव येथील आंबेडकर नगरातील उघड्या गटाराच्या नाल्यामध्ये तीन वर्षांचा चिमुरडा खेळता खेळता काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गटारात पडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. रात्रीपासून बचावकार्य सुरू करण्यात आले असून अद्याप चिमुरड्याचा पत्ता लागलेला नाही. आम्ही शर्थीचे प्रयत्न करत आहोत. गटाराच्या आतून असलेल्या म्हणजेच जमिनीखाली असलेल्या त्या गटाराला लागून असेल्या पाईपपर्यंत शोधकार्य करणारी माणसं पोचली आहे. मात्र, मुलगा सापडलेला नाही. जस जशी जमिनीखालून ती पाईपलाईन जोडलेली आहे तिथंपर्यंत अजून पुढे जाऊन पोलीस, पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांचे मुलाचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी लोकमतशी बोलताना दिली. दिव्यांश असं या चिमुरड्याचं नाव आहे.
पावसामुळे गटार मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला आणि न कळत उघड्या गटारात पडला. गटारातील पाणी जोराने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबतच तो वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुरड्याचा शोध सुरू केला आहे. जेसीबीच्या मदतीने गटार फोडून आत १० किमीपर्यंत जमिनीखालील ड्रेनेज पाइपलाइनमध्ये जाऊन मुलाचा शोध घेणं सुरु आहे. मात्र, आता १५ तास उलटूनही मुलगा सापडला नसल्याने मुलाचे पालक चिंतेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला. मुंबईचेमहापौर विश्वनाथ महाडेश्वर हे आज आंबेडकर नगरमध्ये येण्यापूर्वी येथील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला. तसेच चिमुरडा वाहून जाण्यास महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला.
Operation is underway to rescue the boy who fell in a gutter in Ambedkar Nagar area of Goregaon around 10:24 pm y'day. Operation was carried out along with drainage dept initially. Search was done in drainage line in 10km area&wall was broken with help of JCB.More details awaited https://t.co/sU8xjnsTWl
— ANI (@ANI) July 11, 2019