Join us

पाच वर्षीय मुलीचे सव्वा लाखांसाठी अपहरण; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 8:44 PM

हितेंन नाईकपालघर : एक लाख वीस हजार रुपयांच्या मागणीसाठी पालघरच्या विष्णुनगर येथील पाच वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या प्रीतम कांबळे ...

हितेंन नाईक

पालघर: एक लाख वीस हजार रुपयांच्या मागणीसाठी पालघरच्या विष्णुनगर येथील पाच वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या प्रीतम कांबळे ह्या 25वर्षीय तरुणांच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे.

पालघर शहरातील वर्धमान सृष्टी या इमारतीत राहणाऱ्या भार्गवी बापू जगताप (वय५ वर्ष) ही पालघर येथील वर्धमान सृष्टी या इमारतीत राहत होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या व  नातेवाईक असणाऱ्या सनी कांबळे यांनी दुपारी साडेतीन वाजता तिला फिरायला नेतो असे सांगून गुपचूप घराबाहेर नेले. त्यानंतर आरोपी सनी कांबळे यांनी 4:30 वाजता त्या मुलीचे वडील बापू जगताप  यांना फोन केला व तुमच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे त्यांना सांगितले.

त्यांच्याकडे सर्वप्रथम एक लाख वीस हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. हे पैसे एकत्रित न देता टप्प्या टप्प्याने वीस वीस हजार रुपया प्रमाणे देण्याची अट घालण्यात आली. त्यानंतर त्या आरोपीच्या खात्यामध्ये गुगल पे द्वारे दोन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. त्या नंतर त्याने आपल्या अधिक पैशाच्या मागणी साठी अनेक वेळा कॉल केला.

अपहरण केलेल्या मुलीच्या वडिलांना अपहरणकर्त्या ने आपल्या मोबाईल नंबरवरून फोन केल्यावर पोलिसांनी त्या नंम्बर चे डिटेल्स काढले असता आरोपी हा एडवन,केळवे ,उसरणी ह्या परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे पोलीस नाईक रमेश पालवे भगवान आव्हाड सागर राऊत कल्पेश पाटील आदी पालघर ची टीम तात्काळ आरोपीच्या शोधार्थ रवाना झाली. अनेक भागात शोध घेतल्या नंतर आरोपी हा त्या मुलीला घेऊन केळवे रेल्वे स्थानकात उभा असल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी झडप घालून आरोपीला ताब्यात घेतले.

टॅग्स :मुंबईपालघरगुन्हेगारी