नोटा बदलून दिल्या नाहीत म्हणून अपहरण

By admin | Published: May 7, 2017 06:46 AM2017-05-07T06:46:25+5:302017-05-07T06:46:25+5:30

नोटाबंदीच्या दरम्यान पैसे बदलून देण्यासाठी घेतलेली रक्कम अद्यापही परत न केल्याने मुलुंडमधील दोन तरुणांचे काही

Kidnapping so no notes have been changed | नोटा बदलून दिल्या नाहीत म्हणून अपहरण

नोटा बदलून दिल्या नाहीत म्हणून अपहरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोटाबंदीच्या दरम्यान पैसे बदलून देण्यासाठी घेतलेली रक्कम अद्यापही परत न केल्याने मुलुंडमधील दोन तरुणांचे काही इसमांनी शुक्रवारी रात्री अपहरण केले होते. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासांत वसई येथून या तरुणांची सुटका केली असून अपहरण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
नितीन मच्छर यांना शुक्रवारी रात्री काही अज्ञात इसमांनी फोन करून त्यांचा भाऊ सुनील मच्छर आणि त्याचा मित्र भरतकुमार सिराई यांचे अपहरण केल्याचे फोनवरून सांगितले. तसेच त्याला सोडवायचे असल्यास वसई येथे १ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. नितीन मच्छर यांनी तत्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल होत अपहरणाची माहिती दिली. मुलुंड पोलिसांनीदेखील याची गंभीर दखल घेत त्यांची दोन पथके वसई येथे दाखल झाली. त्यानंतर वसई परिसरात शोध घेत असताना आरोपी मनिष ठाकूर याच्या कार्यालयात या दोघांना डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ येथे छापा घालत या दोन तरुणांची सुटका केली. तर या वेळी मनिष ठाकूरसह जनप्रकाश पुरोहित, सिद्दीक राहीन, प्रसन्ना कुमार आणि हितेश पटेल या पाच जणांना ताब्यात घेत अटक केली. नोटाबंदीनंतर जनप्रकाश आणि हितेश यांच्याकडून यातील पीडित तरुणांनी १ कोटी १३ लाखांच्या जुन्या नोटा बदली करण्यासाठी घेतल्या होत्या. त्यानंतर या नोटा या दोघांनी अन्य तरुणांकडे दिल्या. मात्र या नोटा मिळाल्यानंतर या सर्वांनी पोबारा केला. त्यामुळे हितेश आणि जनप्रकाश याने अनेकदा तगादा लावूनदेखील या तरुणांनी पैसे परत न केल्याने त्यांचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

Web Title: Kidnapping so no notes have been changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.