Join us  

किडनी रॅकेट - हिरानंदानी हॉस्पिटलच्या ५ डॉक्टरांना पोलिस कोठडी

By admin | Published: August 10, 2016 5:12 PM

पवईतील प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या आरोपींना १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - पवईतील प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या आरोपींना १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १४ जणांना अटक झाली आहे. यात पाच डॉक्टरांचा समावेश आहे. 
 
राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हिरानंदानी रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती दिली आहे. अटक केलेल्या 5 डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा सीईओ आहे तर एक जण वैद्यकीय संचालक असल्याची माहिती आहे. 
 
मुंबईमधील किडनी रॅकेट प्रकरणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. किती वर्षापासून हे रॅकेट सुरु होतं याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. याप्रकरणी पुरावा मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन पाचही डॉक्टरांना बेड्या ठोकल्या आहेत.