दुर्मीळ शस्त्रक्रियेत ४१ वर्षीय रुग्णाच्या शरीरातून काढली मूत्रपिंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:28 AM2020-02-25T03:28:14+5:302020-02-25T03:28:21+5:30

रुग्णांची प्रकृती स्थिर; स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटेशनने नवजीवन

Kidney removed from the body of a 3-year-old patient in rare surgery | दुर्मीळ शस्त्रक्रियेत ४१ वर्षीय रुग्णाच्या शरीरातून काढली मूत्रपिंडे

दुर्मीळ शस्त्रक्रियेत ४१ वर्षीय रुग्णाच्या शरीरातून काढली मूत्रपिंडे

Next

मुंबई : ऑटोसोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (एडीपीकेडी) हा मूत्रपिंडाचा आनुवंशिक घातक आजार असलेल्या व्यक्तीच्या शरीरातून तज्ज्ञांनी ७ किलो व ५.८ किलो वजनाची मूत्रपिंडे काढून टाकली. या दोन्ही किडन्यांचे एकूण वजन १२.८ किलो होते.

परळच्या खासगी रुग्णालयात युरोलॉजी व रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव आणि डॉ. भरत शहा यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीपणे मूत्रपिंडे काढून त्याच वेळी ‘स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटेशन’ शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाला नवसंजीवनी दिली. ४१ वर्षीय रुग्णाच्या पत्नीने तिचे मूत्रपिंड अमरावतीतील नितीन टापरा यांना दिले. तर नितीन यांच्या पत्नीने त्यांचे मूत्रपिंड गोव्याचे रहिवासी रोमन परेरा (६०) यांना दिले. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती.

युरोलॉजी व रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव म्हणाले, बहुदा कीहोल शस्त्रक्रिया या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मूत्रपिंडे काढण्यात येत असली तरी रोमन यांच्या मूत्रपिंडांची लांबी सुमारे फूटभर होती. त्यामुळे लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया अशक्य असल्याने ओपन शस्त्रक्रिया केली. १२.८ किलो वजन असलेली दोन्ही मूत्रपिंडे एक छेद देऊन काढू शकलो. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी रोमन यांच्या शरीरातील ७ किलो व ५.८ किलो वजनाची दोन्ही मूत्रपिंडे काढली. सामान्य मूत्रपिंडाचे वजन सुमारे १५० ग्रॅम आणि लांबी सुमारे ८-१० सेमी असते. पण रोमन यांच्या शरीरातून काढलेल्या मूत्रपिंडांचे वजन सुमारे २६ सेमी आणि २१ सेमी होते.

रक्तगट एकमेकांशी जुळणारा नव्हता
डॉ. भरत शाह यांनी सांगितले की, गोव्यातील रोमन, अमरावतीतील नितीन यांच्यावर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. रोमन व त्यांच्या पत्नीचा रक्तगट एकमेकांशी जुळणारा नव्हता. नितीन आणि त्यांच्या पत्नीच्या ऊतीचा प्रकारही एकमेकांशी जुळणारा नव्हता. डॉक्टरांनी दोन्ही कुटुंबांशी स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटबाबत सांगितले. १७ डिसेंबर २०१९ रोजी दोन्ही प्रत्यारोपणे केली. दोन्ही रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

Web Title: Kidney removed from the body of a 3-year-old patient in rare surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.