मुंबई : जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २२ वर्षांत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. मात्र यासह प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्याही कमालीची वाढत असल्याचे समितीच्या माहितीतून उलगडले आहे. १९९७ ते २०१९ या दरम्यान झालेल्या अवयव प्रत्यारोपणात ७३४ मरणोत्तर मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे. मात्र असे असले तरीही अजूनही मुंबई शहर - उपनगरात ३ हजार ५६४ रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षायादीत आहेत. त्यामुळे अजूनही समाजात विविध पातळ्यांवर अवयवदानाविषयी जनजागृती वाढविण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.१४ मार्च रोजी असणाऱ्या ‘जागतिक मूत्रपिंड दिना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीने ही माहिती दिली. या वेळी, गेल्या २२ वर्षांत सर्वांत कमी प्रत्यारोपण फुप्फुसाचे झालेले दिसून आले आहे. ६१ नोंदणीकृत रुग्णांपैकी केवळ ११ जणांचे फुप्फुस प्रत्यारोपण पार पडले असून अजूनही २० रुग्ण प्रतीक्षायादीत आहेत. २०१२ नंतर मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. २०१२ ते २०१९ यादरम्यान मरणोत्तर ८१३ मूत्रपिंड मुंबईत दान करण्यात आले आहेत. यंदाच्या नव्या वर्षात मूत्रपिंड प्रत्यारोपणाने उच्चांक गाठला असून, एकूण ४५ मरणोत्तर प्रत्यारोपणांपैकी २३ मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले, ही संख्या सर्वाधिक आहे.याविषयी, जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीचे सदस्य आणि सायन रुग्णालयाच्या पोटविकार विभागाचे प्रमुख डॉ. आकाश शुक्ला यांनी सांगितले की, मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा आकडा वाढता दिसत असला तरीही जागतिक पातळीवर तुलना केल्यास आपण अजूनही खूप मागे आहोत. त्यामुळेच याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण पातळीवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र तरीही याविषयी तेथे पुरेशी माहिती नसते. त्यामुळे तळागाळात याविषयी सर्वात जास्त जनजागृती करण्याचे काम समितीद्वारे हाती घेण्यात आले आहे. बऱ्याच अंशी डायलिसिस हीच मूत्रपिंड आजारावर उपचारपद्धती आहे, असे समजूनही अनेक रुग्ण प्रत्यारोपणाचा मार्ग अवलंबत नसल्याने हे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात येत आहे. मूत्रपिंड दाते आणि रुग्ण यांच्या संख्येतीत समतोल साधण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच जनजागृतीद्वारे हाच समतोल साधण्याचा प्रयत्नही समितीकडून करण्यात येत आहे.>अवयव नोंदणीकृत प्रतीक्षायादीतील मरणोत्तर टक्केवारीरुग्णसंख्या रुग्णसंख्या अवयव दानमूत्रपिंड ८३३१ ३५६४ ७४३ ७.१५यकृत ३०४९ ४३५ ३१३ ९.९हृदय २३५ २७ ११३ ४५.४फुप्फुस ६१ २० ११ २०.४
मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा आलेख २२ वर्षांत वाढता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:19 AM